नवी दिल्ली - मोटोरोलाने मार्केटमध्ये आपले दोन नवीन दमदार स्मार्टफोन Moto G30 आणि Moto G10 लाँच केले आहेत. सुरुवातीला कंपनीने या दोन्ही फोनला युरोपमधील काही देशात लाँच केलं आहे. तसेच भारतात लवकरच हे फोन लाँच होण्याची शक्यता आहे. मोटो G30 ची किंमत 180 यूरो म्हणजेच जवळपास 15,900 रुपये आहे. तर मोटो G10 ची किंमत 150 यूरो म्हणजेच जवळपास 13,200 रुपये आहे. मोटोरोलाच्या या दोन जबरदस्त स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊया.
मोटो G30 चे स्पेसिफिकेशन्स
- मोटो G30 फोनमध्ये 720x1600 पिक्सल रेजॉलूशन सोबत 6.5 इंचाचा IPS LCD दिला आहे.
- डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेट सोबत येतो. फोनचा डिस्प्ले नॉज डिझाइनचा आहे. यात 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
- फोनच्या रियरमध्ये फोटोग्राफीसाठी चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात 64 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि एक 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे.
- फोन 4 जीबी आणि 6 जीबी रॅम ऑप्शन आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येणार आहे.
- प्रोसेसर म्हणून फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट दिला आहे.
- फोन अँड्रॉईड 11 ओएसवर काम करतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. 20 वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येणार आहे.
मोटो G10 चे स्पेसिफिकेशन्स
- मोटो G10 या फोनमध्ये कंपनीने 60Hz च्या रिफ्रेश रेट 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला आहे.
- फोनला 4 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज ऑप्शन दिला आहे. फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढू शकते.
- फोनमध्ये 460 चिपसेट दिला आहे. जो स्नॅपड्रॅगन 662 चे एक क्लॉक्ड डाऊन व्हर्जन आहे.
- फोटोग्राफीसाठी फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगलसोबत 2 मेगापिक्सलचा कॅमेरे दिले आहे.
- सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यसाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. 10 वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मस्तच! 5G स्मार्टफोनसाठी स्वदेशी कंपनीची जोरदार तयारी; Micromax चीनी कंपन्यांना पडणार भारी
भारतात Micromax चा 5G फोन लवकरच लाँच करण्यात येणार आहे. कंपनीचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी युजर्ससोबत असलेल्या एका व्हिडीओ सेशनमध्ये याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी कंपनीचे पहिले ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) इअरबड्स देखील लवकरच लाँच केले जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. मायक्रोमॅक्सने गेल्याच वर्षी भारतीयस्मार्टफोन बाजारात पुनरागमन केलं आहे. राहुल शर्मा यांनी बंगळुरूच्या R&D सेंटरमध्ये इंजिनिअर 5G फोनसाठी खूप जास्त मेहनत करत असल्याचं म्हटलं आहे. मात्र याच्या लाँचिंगबाबत नेमकी माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. लवकरच तो लाँच केला जाईल असं म्हटलं आहे. गेल्या वर्षा शर्मा यांनी एका मॉडल संदर्भात काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामध्ये 6GB रॅम, हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि लिक्विड कूलिंग देण्यात येईल असं म्हटलं होतं. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळेच हे स्पेसिफिकेशन्स हे मायक्रोमॅक्सच्या अपकमिंग 5G फोनमध्ये दिले जाऊ शकतात.
टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....