Motorola नं आपल्या ‘जी’ सीरिजचा अजून फोन भारतात सादर केला आहे. कंपनीनं सर्वात स्वस्त 5G Phone देशात Moto G51 5G नावानं सादर केला आहे. हा फोन फ्लिपकार्टवर खरीदीसाठी उपलब्ध होईल. यात Snapdragon 480+ चिपसेट, 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले, 50MP Camera आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Moto G51 5G Phone चे स्पेसिफिकेशन्स
Moto G51 5G स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी Moto G51 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये 3.5mm ऑडियो पोर्ट, USB Type-C पोर्ट, गुगल असिस्टंट बटन, IP52 रेटिंग, डॉल्बी अॅटमॉस आणि साइड माउंटेड फिगर प्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
Moto G51 चा कॅमेरा सेगमेंट पाहता, यात LED फ्लॅश असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमधील कॅमेऱ्याचे रिजोल्यूशन 50MP आहे. ज्याला 2MP च्या मॅक्रो कॅमेरा आणि 8MP च्या अल्ट्रा वाईड अँगल सेन्सरची जोड देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 13MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.
Moto G51 स्मार्टफोनमध्ये Qualcomm च्या Snapdragon 480+ SoC ची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. तसेच हा फोन ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU ला सपोर्ट करतो. कंपनीने हा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर केला आहे. या मोटोरोलाच्या 5G Phone मधील स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.
Moto G51 5G Price In India
Moto G51 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट देशात आला आहे. ज्यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळते. कंपनीनं या फोनची किंमत 14,999 रुपये ठेवली आहे. हा मोटोरोला स्मार्टफोन ब्राईट सिल्वर आणि इंडिगो ब्लू कलरमध्ये विकत घेता येईल. मोटोरोलाचा स्मार्टफोन Flipkart वरून 16 डिसेंबरपासून विकत घेता येईल.