Budget 5G Phone च्या यादीत Motorola च्या Moto G51 स्मार्टफोनचा लवकरच समावेश होऊ शकतो. गेले कित्येक दिवस लीक आणि रिपोर्ट्स मधून हा फोन समोर आला आहे. या लिक्समधून फोनच्या काही स्पेक्सची माहिती उघड झाली आहे. परंतु आता एका रिपोर्टमधून या फोनच्या लाँचची माहिती समोर आली आहे. ताज्या रिपोर्ट्सनुसार Moto G51 स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये लाँच केला जाईल.
Motorola Moto G51 लाँच
रिपोर्टनुसार मोटोरोला मोटो जी51 स्मार्टफोन नोव्हेंबरमध्ये सादर केला जाईल. लीकमध्ये या फोनच्या XT2171-1 मॉडेल नंबर आणि Cyprus 5G या कोडनेमचा उल्लेख आहे. त्यानुसार हा एक 5जी फोन आहे हे समजले आहे. तसेच यात फुलएचडी+ रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळेल, हे देखील समजले आहे.
Motorola Moto G51 चे लीक स्पेक्स
Motorola Moto G51 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. त्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर मिळेल. तसेच 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर असेल. हा फोन 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात येईल.
गीकबेंचच्या लिस्टिंगनुसार Motorola Moto G51 4 जीबी रॅमसह सादर केला जाईल. तसेच यात अँड्रॉइड 11 ओएस मिळेल. प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 750जी चिपसेट असल्याचे कोडनेम मधून समजले आहे. ज्याला एड्रेनो 619 जीपीयूची मदत मिळेल. या स्पेक्सवरून हा एक मिडरेंज 5G फोन असेल असे वाटत आहे.