Motorola नं आपल्या ‘जी’ सीरिजचा विस्तार केला आहे. कंपनीनं चीनमध्ये Moto G71 5G Phone सादर केला आहे. हा फोन 8GB RAM, 50MP Camera, 30W फास्ट चार्जिंग आणि 5000mAh बॅटरीसह बाजारात आला आहे. चला जाणून घेऊया या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
Moto G71 5G ची किंमत
कंपनीनं या फोनचा एकमेव व्हेरिएंट चीनमध्ये सादर केला आहे. ज्यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा डिवाइस नेब्युला ग्रीन आणि ग्लेशियर ब्लू कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. या मोबाईलसाठी 1699 युआन मोजावे लागतील. ही किंमत सुमारे 19,900 रुपयांमध्ये रूपांतरित होते.
Moto G71 5G चे स्पेसिफिकेशन
मोटोरोलाचा नवीन फोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेसह बाजारात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 अधरती माययुआयवर चालतो. या फोनला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. सोबत 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. यातील एक्सटेंडेड रॅम फिचरमुळे अतिरिक्त 3 जीबी रॅम मिळवता येतो.
फोटोग्राफीसाठी फोनच्या एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि एक 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कामेरील सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह या मोटोरोला मोबाईलमध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर यातील 5000mAh ची बॅटरी 30 वॉट फास्ट चार्जिंगने चार्ज करता येते.
हे देखील वाचा:
कॉल, चार्जिंग करताना स्मार्टफोन गरम होतो का? या टिप्स ठेवतील तुमचा फोन कूल