Motorola भारतात आपल्या मोटो ‘जी’ सीरीजचा विस्तार सुरूच ठेवणार आहे. कंपनी Moto G31 आणि Moto G51 5G नावाच्या फोन्सनंतर आता नवीन 5G Phone लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीचा Moto G71 5G Phone जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भारतीयांच्या भेटीला येणार आहे. कंपनी या आठवड्यात हा फोन टीज करू शकते तर पुढील आठवड्यात हा फोन सादर केला जाईल.
Motorola Moto G71 5G चे स्पेसिफिकेशन्स
Moto G71 5G स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंसाठी यात Qualcomm Snapdragon 695 चिपसेट मिळतो. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU देण्यात आला आहे. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर झाला आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते.
Moto G71 स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. या कॅमेऱ्याला 8MP च्या अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2MP च्या मॅक्रो कॅमेरा लेन्सची जोड देण्यात आली आहे. या डिवाइसमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. या मोबाईलमध्ये 5000mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
Motorola Moto G71 ची किंमत
Moto G71 5G स्मार्टफोनची किंमत युरोपमध्ये 299.99 यूरो (अंदाजे 25,200 रुपये) ठेवण्यात आली आहे. मोटोरोलाचा हा फोन नेपच्यून ग्रीन, आर्टिक ब्लू आणि आयर्न कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. युरोपनंतर हा फोन जगभरात देखील उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.
हे देखील वाचा:
जुना Realme फोन द्या अन् एकही रुपया न देता नवीन शानदार 5G Phone घ्या; अशी आहे हटके ऑफर