Motorola नं 10 जानेवारीला भारतात नवीन 5G Phone येणार असल्याचं आधीच सांगितलं आहे. हा फोन Moto G71 5G नावानं देशात दाखल होईल. याआधी जागतिक बाजारात लाँच झाल्यामुळे या हँडसेटच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती सहज उपलब्ध आहे. परंतु भारतात आल्यानंतर या फोनची किंमत किती ठेवण्यात येईल, हे मात्र अजूनही समजले नव्हते. आता या आगामी मोटोरोला 5G Phone ची किंमत लीक झाली आहे.
Moto G71 5G India Price
मोटो जी71 5जी फोनच्या भारतीय किंमतची माहिती टिपस्टर अभिषेक यादवनं दिली आहे. या लीकनुसार Moto G71 5G स्मार्टफोन भारतात 18,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. लीकनुसार हा स्मार्टफोन ईकॉमर्स साईट फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. अधिकृत माहितीसाठी आपल्याला 10 जानेवारीच्या लाँचची वाट बघावी लागेल.
Motorola Moto G71 5G चे स्पेसिफिकेशन्स
Moto G71 5G स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंसाठी यात Qualcomm Snapdragon 695 चिपसेट मिळतो. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU देण्यात आला आहे. हा फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर झाला आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. तर रॅम देखील 11GB करता येईल.
Moto G71 स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. या कॅमेऱ्याला 8MP च्या अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2MP च्या मॅक्रो कॅमेरा लेन्सची जोड देण्यात आली आहे. या डिवाइसमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. या मोबाईलमध्ये 5000mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
काय सांगता! 6000 रुपयांच्या आत मिळतायत दमदार Branded Smartphone; पाहा यादी
Xiaomi च्या सर्वात स्लिम 5G फोनवर 5,500 ऑफ; फोनमध्ये 8GB RAM आणि 64MP कॅमेरा