मोटोरोलानं यंदा जणू स्मार्टफोन लाँच करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. कंपनी दमदार फ्लॅगशिप तर बाजारात घेऊन येत आहेच परंतु मिडरेंजमध्ये देखील कंपनी सक्रिय आहे. आता Motorola Moto G71s चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन 120Hz डिस्प्ले, Snapdragon 695 प्रोसेसर, 8GB RAM आणि 5,000mAh च्या बॅटरीसह बाजारात आला आहे.
Moto G71s चे स्पेसिफिकेशन्स
यात 6.6 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. डिस्प्लेमध्ये DCI-P3 व DC डीमिंग असे फीचर्स मिळतात. या फोनमध्ये 50,00,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो मिळतो. फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरनं सुसज्ज आहे, सोबत Adreno 619 GPU देण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. जी मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. हा फोन Android 12 बेस्ड My UX 3.0 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे, जो OIS ला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 8MP चा अल्ट्रा-वाईड सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. शानदार ऑडियोसाठी यात Dolby Atmos सपोर्टसह स्टीरियो स्पिकर्स देण्यात आले आहेत. Moto G71s मधील 5,000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Moto G71s ची किंमत
Moto G71s चा एकच व्हेरिएंट चीनमध्ये आला आहे. या मिडरेंज स्मार्टफोनची किंमत 1,699 युआन (19,500 रुपये) ठेवण्यात आली आहे. ही किंमत 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलची आहे. हा हँडसेट व्हाईट आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात देखील सादर केला जाऊ शकतो.