मोटोरोलानं गेल्या आठवड्यात भारतात आपला नवीन स्मार्टफोन Moto G82 5G लाँच केला आहे. मिडरेंजमध्ये आलेल्या या फोनमध्ये असे काही फीचर्स देण्यात आले आहेत, जे प्रीमियम स्मार्टफोन्समधेच देण्यात येतात. हा फोन 10 बिट डिस्प्ले आणि OIS कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे. आज 14 जूनला या फोनचा पहिला सेल होणार आहे.
Moto G82 5G चे स्पेसिफिकेशन्स
Moto G82 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा 10 बिलियन रंग दाखवू शकणारा 10 बिट पॅनल आहे. प्रोसेसिंगसाठी स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. फोनमध्ये ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU देण्यात आला आहे. सोबत 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते, जी मेमरी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येते. Motorola चा हा फोन Android 12 OS वर चालेल.
Moto G82 ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टमसह येतो, ज्यात 50MP चा प्रायमरी सेन्सर OIS सह देण्यात आला आहे. सोबत 8MP चा अल्ट्रा-वाईड-अँगल कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देखील आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, 13 5G बँड आणि IP52 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्स रेटिंग मिळते. Moto G82 मध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 30W वायर्ड फास्ट-चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत आणि ऑफर्स
Moto G82 5G चा सेल 14 जूनला दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर सुरु होईल. फोनची किंमत 21,499 रुपयांपासून सुरु होते. परंतु एसबीआय क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रांजेक्शनवर 1500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल त्यामुळे फोनची किंमत 19,999 रुपये होईल. तसेच जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही 12,500 रुपयांपर्यंतची बचत करू शकता.