भारतीय बाजारातील टॅबलेट सेगमेंटमधील गर्दी वाढत आहे. गेल्या महिन्यात Moto Tab G20 लाँच केल्यानंतर आता Motorola च्या नव्या टॅबची माहिती आली आहे, जो Moto Tab G70 नावाने सादर केला जाऊ शकतो. या मोटोरोला टॅबमध्ये अपग्रेडेड स्पेसिफिकेशन्स मिळतील. Motorola नं अधिकृत माहिती दिली नसली तरी Moto Tab G70 टॅबलेट अनेक सर्टिफिकेशन्स साईट्सवर लिस्ट करण्यात आला आहे.
Moto Tab G70 टॅबलेट आता ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) वर लिस्ट करण्यात आला आहे. तसेच टिपस्टर यशनं देखील अजून मोटोरोला टॅबलेट BIS वर स्पॉट केला आहे, ज्याचे नाव Moto Tab G70 LTE आहे. कंपनी नेहमीच लेनोवोचे टॅब रीब्रँड करते त्यामुळे हे दोन्ही टॅब देखील मूळ लेनोवो टॅबलेटमध्ये बदल करून सादर केले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.
Moto Tab G70 चे स्पेसिफिकेशन्स
Moto Tab G70 टॅबलेटमध्ये 2000 x 1200 पिक्सल रिजोल्यूशन असलेला WUXGA+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. याला MediaTek Kompanio SoC ची प्रोसेसिंग पॉवर मिळेल. हा आगामी मोटोरोला टॅब 4GB रॅमसह सादर केला जाईल, असा अंदाज लावला जात आहे. यात टॅबलेटमध्ये Android 11 मिळण्याची शक्यता आहे.
Motorol Moto Tab G70 टॅब याआधी Geekbench च्या “P11” मदरबोर्डसह लिस्ट केला गेला होता. जे लेनोवोच्या टॅबलेटचे नाव आहे. त्यामुळे हा टॅब Lenovo Tab P11 सीरीजमधील एखाद्या टॅबचा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. गीकबेंचवर Moto Tab G70 ला सिंगलकोर टेस्टमध्ये 475 आणि मल्टीकोर टेस्टमध्ये 1,569 पॉइन्टस मिळाले आहेत.