Motorola नं भारतात आपला अँड्रॉइड टॅबलेटचा पोर्टफोलियो वाढवणार आहे. कंपनीचा नवीन टॅबलेट डिवायस देशात Moto Tab G70 नावानं लाँच होईल. आता हा टॅबलेट शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. टॅबलेटच्या या प्रोडक्ट पेजवरून मोटो टॅब जी70 चे फोटो आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.
फ्लिपकार्ट लिस्टिंगमधून हा फोन कधी लाँच होईल हे मात्र समजले नाही. तसेच टॅबची किंमत किती असेल हे देखील सांगण्यात आले नाही. मीडिया रिपोर्टनुसार कंपनी आपला आगामी मोटो जी71 5G Phone आणि हा टॅब एकाच वेळी सादर केले जाऊ शकतात.
Moto Tab G70 चे स्पेसिफिकेशन्स
फ्लिपकार्ट लिस्टिंग नुसार, Moto Tab G70 मध्ये 11 इंचाचा डिस्प्ले आहे. हा एक 2K रिजोल्यूशन असलेला आयपीएस एलसीडी डिस्प्ले. जो 400निट्स ब्राईटनेस आणि आय कंफर्ट फीचरसह सादर केला जाईल. हा टॅब अॅल्युमिनियम एलॉय बॉडी आणि आयपी52 रेटेड वॉटरप्रूफ रेटिंगसह विकत घेता येईल. Moto Tab G70 अँड्रॉइड 11 ओएसवर सादर केला जाईल
प्रोसेसिंगसाठी यात 2.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी90टी चिपसेट देण्यात आला आहे. कंपनीनं यात 4 GB RAM आणि 64 GB इंटरनल स्टोरेज दिली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी यात 13 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच हा मोटो टॅब 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह येणारा हा डिवाइस ड्युअल माइक आणि क्वॉड स्पिकरला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी मोटो टॅब जी70 मध्ये 7,770एमएएचची बॅटरी मिळणार आहे.
हे देखील वाचा:
न्यू ईयर गिफ्ट! व्हॉट्सॲपवर यंदा मिळणार भन्नाट फीचर्स
जुना Realme फोन द्या अन् एकही रुपया न देता नवीन शानदार 5G Phone घ्या; अशी आहे हटके ऑफर