Motorola नं भारतात आपला नवीन टॅबलेट अखेर सादर केला आहे. या टॅबलेटकडून फक्त सॅमसंग नव्हे तर रियलमीच्या टॅबलेट डिव्हाइसेसना देखील चांगली टक्कर मिळेल. या टॅबलेटकला कंपनीनं Moto Tab G70 असं नाव दिलं आहे. यातील 7,700mAh ची अवाढव्य बॅटरी याची खासियत म्हणता येईल. हा टॅबलेट Flipkart वरून विकत घेता येईल.
Moto Tab G70 Price
Moto Tab G70 ची किंमत 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही टॅबलेटच्या एकमेव 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेलची आहे. हा मोटो टॅबलेट 18 जानेवारीला Flipkart’s Big Saving Days sale मध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे ICICI कार्ड धारकांना याच्या खरेदीवर 10 टक्के डिस्काउंट दिला जात आहे.
Moto Tab G70 चे स्पेसिफिकेशन्स
Moto Tab G70 मध्ये 11 इंचाचा डिस्प्ले आहे. हा एक 2K रिजोल्यूशन असलेला आयपीएस एलसीडी डिस्प्ले. जो 400निट्स ब्राईटनेस आणि आय कंफर्ट फीचरसह सादर झाला आहे. हा टॅब अॅल्युमिनियम एलॉय बॉडी आणि आयपी52 रेटेड वॉटरप्रूफ रेटिंगसह विकत घेता येईल. Moto Tab G70 अँड्रॉइड 11 ओएसवर चालतो.
प्रोसेसिंगसाठी यात 2.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी90टी चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्स साठी माली जी76 जीपीयू देण्यात आला आहे. कंपनीनं यात 4 GB RAM आणि 64 GB इंटरनल स्टोरेज दिली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी यात 13 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच हा मोटो टॅब 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह येणारा हा डिवाइस ड्युअल माइक आणि क्वॉड स्पिकरला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी मोटो टॅब जी70 मध्ये 7,770एमएएचची बॅटरी मिळते.
हे देखील वाचा:
30 हजारांच्या आत Windows 11 असलेला शानदार लॅपटॉप; 16GB RAM सह 10th जेनेरेशन Intel प्रोसेसर