शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

सहा कॅमेरे, पॉवरफुल बॅटरीसह येतोय धमाकेदार फोन Motorola Nio

By जयदीप दाभोळकर | Published: January 18, 2021 3:35 PM

पाहा काय असतील स्पेसिफिकेशन्स

ठळक मुद्देयापूर्वी मोटोरोलानं लाँच केला होता सर्वात स्वस्त 5G फोनMotorola Nio हा फोन स्काय कलर ऑप्शनसह येण्याची शक्यता

भारतात सध्या कोणतीही मोबाईल कंपनी 5G सुविधा देत नसली तरी येत्या काळात देशात 5G सुविधा सुरू होण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे भविष्याकडे पाहून अनेक ग्राहकांचा कलही 5G मोबाईल्सकडेच वळत असल्याचं दिसून येत आहे. Motorola Moto G 5G हा सर्वात स्वस्त मोबाईल लाँच करून धुमाकुळ घातलेल्या स्मार्टफोन कंपनी Motorola आता भारतात आपला आणखी एक फोन Motorola Nio लाँच करण्याच्या तयारीत आहे. या मोबाईलमध्ये तब्बल ६ कॅमेरे, मोठी बॅटरी, हार्ड डिस्प्ले रिफ्रेशरेटसह पॉवरफुल प्रोसेसरही असणार आहे. Motorola Nio (कोडनेम) मध्ये ६४ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असणार आहे. याव्यतिरिक्त यामध्ये अनेक भन्नाट फिचर्स असणार आहेत. युझर्समध्येही आतापासूनच या मोबाईलची क्रेझ पाहायला मिळत आहे. नुकतंच व्हॉईसवर Nils Ahrensmeier (@NilsAhrDE) ने जारी केलेल्या फोटोनुसार Motorola Nio हा फोन स्काय कलर ऑप्शनसह Beryl व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाणार आहे. Motorola Nio च्या उजवीकडील बाजूला वॉल्युम बटन आणि पॉवर बटनसह फिंगरप्रिन्ट सेन्सरही असणार आहे. याव्यतिरिक्त Audio Zoom हे फीचरही दिलं जाण्याची शक्यता आहे. हे फिचर सध्या अन्य मोबाईल कंपन्यांच्या फ्लॅगशिप फीचरसह मिळतं. येत्या काळा मोटोरोला हा फोन Motorola Edge S या नावानंदेखील लाँच करू शकतो.

काय असू शकतात स्पेसिफिकेशन्सMotorola Nio च्या लिक स्पेसिफिकेशन्सनुसार यात ६.७ इंचाचा Full HD+ डिस्प्ले देण्यात ला आहे. याचं रिझॉल्युशन 1080*2520 पिक्सेल असेल. Motorola Nio हा स्मार्टफोन Android 11 वर चालणार आहे आणि यात Qualcomm Snapdragon 865 SoC हा प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनी हा फोन 105Hz डिस्प्ले रिफ्रेश रेटनं लाँच करू शकते. तसंच या मोबाईल ८ जीबी आणि १२ जीबी रॅम व्हेरिअंटसह येण्याची शक्यता आहे. तसंच सेल्फीच्या चाहत्यांसाठी हा फोन पर्वणीच ठरणार आहे. य़ा फोनमध्ये दोन फ्रन्ट कॅमेरे देण्यात आले आहे. तसंच मागील बाजूला ४ कॅमेरे असणार असून यातील मुख्य कॅमेरा ६४ मेगापिक्सेलचा असेल.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलMotorolaमोटोरोलाAndroidअँड्रॉईड