स्मार्टफोन विश्वात फोल्डेबल फोन्स नावीन्य घेऊन येत आहेत. या सेगमेंटमध्ये सॅमसंग आघाडीवर आहे. गेल्यावर्षी आलेला Samsung Galaxy Z Flip 3 अनेकांना आवडला होता. हा परफेक्ट फोल्डेबल असल्याचं अनेक युजर्सनी म्हटलं होतं. आता त्याच फॉर्म फॅक्टरसह Motorola Razr 3 स्मार्टफोन येतोय. परंतु यात मिड रेंज स्पेक्स देण्याची चूक कंपनी सुधारणार असल्याचं Technik News नं आपल्या रिपोर्टमधून सांगितलं आहे.
Motorola Razr 3 चे लीक स्पेसिफिकेशन्स
XDA च्या रिपोर्टनुसार, Motorola Razr 3 स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. हा क्वॉलकॉमचा लेटेस्ट फ्लॅगशिप चिपसेट आहे. याआधी मोटोरोलानं Razr फ्लिप फोनमध्ये मिड रेंज चिपसेट देण्याची चूक केली होती. सोबत 12GB पर्यंतचा रॅम आणि 512GB पर्यंतची स्टोरेज देखील दिली जाऊ शकते.
यावेळी कंपनी पंच होल कटआउटमध्ये सेल्फी कॅमेरा देऊ शकते. तसेच Razr 3 फोल्डेबल फोनमध्ये AMOLED पॅनल 120Hz रिफ्रेश रेटसह मिळू शकतो. यातील मुख्य डिस्प्ले फुल एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. जुन्या डिजाईनप्रमाणे सेकंडरी डिस्प्ले देखील देण्यात येईल. मोटोरोलाचा हा फोन Android 12 OS वर चालेल.
Razr 3 फोनमध्ये 2,800mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सल OV50A OmniVision प्रायमरी कॅमेरा दिला जाईल, सोबत 13-मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड आणि मॅक्रो कॅमेरा मिळेल. पंच होलमधील सेल्फी कॅमेरा 32-मेगापिक्सलचा OmniVision सेन्सर असेल. मीडिया रिपोर्टनुसार Motorola Razr 3 स्मार्टफोन जून 2022 मध्ये लाँच केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा:
512GB स्टोरेजसह आला जगातील सर्वात ‘पातळ' Foldable Phone; सॅमसंग-शाओमी नाही तर या कंपनीनं केली कमाल