Motorola नं सध्या भारतीय बाजारपेठ गांभीर्यानं घेतली आहे. नवनवीन स्मार्टफोन्स तर कंपनी सादर करत आहेच सोबत टॅबलेट आणि स्मार्ट टीव्ही देखील भारतात येत आहेत. आज भारतात कंपनीनं Revou 2 ही नवीन Smart TV सीरिज सादर केली आहे. या सीरिजमध्ये 32 इंच ते 55 इंचाच्या एचडी, फुल एचडी आणि 4K रिजोल्यूशन असलेल्या मॉडेल्सचा समावेश आहे.
स्पेससिफिकेशन्स
32 इंचाचा सर्वात छोटा मॉडेल एचडी रेडी टीव्ही आहे. जो 1366x768 पिक्सल रिजोल्यूशनसह 300 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. यात 2 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल स्टोरेजसह क्वॉड-कोर मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. 40 आणि 43 इंचाचे मॉडेल फुल एचडी रिजोल्यूशनसह 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात. यात 1920x1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 300 निट्स ब्राईटनेस मिळते. प्रोसेसिंगसाठी 2जीबी रॅम, 8जीबी स्टोरेज आणि मीडियाटेकचा क्वॉड-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
43, 50 आणि 55 इंचाचे मॉडेल 4K रिजोल्यूशनसह येतात. यात 3840x2160 पिक्सल रिजोल्यूशन मिळतं. स्मूद पिक्चर क्वॉलिटीसाठी 60Hz रिफ्रेश रेट देखील देण्यात आला आहे. त्याचबरोबर डॉल्बी व्हिजन आणि दमदार साउंडसाठी डॉल्बी अॅटमॉसला सपोर्ट मिळतो. डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून लो ब्लू लाईट एमिशन टेक्नॉलजीचा वापर केला आहे. सर्व टीव्ही 2 जीबी रॅम, 8जीबी स्टोरेज आणि क्वॉड-कोर मीडियाटेक प्रोसेसरसह येतात.
हे सर्व टीव्ही अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. या सीरिजचे सर्व मॉडेल डॉल्बी ऑडियो आणि डॉल्बी अॅटमॉस असलेल्या 24 वॉटच्या स्पिकर्सना सपोर्ट करतात. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 802.11ac, ब्लूटूथ, 3 HDMI पोर्ट, 2 यूएसबी 2.0 पोर्ट आणि ईथरनेट पोर्ट देण्यात आला आहे.
किंमत
कंपनीच्या 32 इंचाच्या एचडी रेडी टीव्हीची किंमत 13,999 रुपये, 40 इंचाच्या फुल एचडी मॉडेलची किंमत 20,990 रुपये, 43 इंचाचा फुल एचडी टीव्ही 23,990 रुपये, 43 इंचाचा 4K टीव्ही 26,999 रुपये, 50 इंचाचा 4K टीव्ही 31,990 रुपये आणि 55 इंचाचा 4K टीव्ही 37,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. मोटोरोलाचे हे स्मार्ट टीव्ही आजपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होतील.