Motorola नं या वर्षाच्या सुरूवातीला ट्रू वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीची एक झलक दाखवली होती. या तंत्रज्ञानाचा वापर करून चार्जर आणि डिव्हाईसमध्ये कोणत्याही फिजिकल कॉन्टॅक्टची गरज भासत नाही. परंतु आता कंपनीनं या तंत्रज्ञानाचं अपडेटेड व्हर्जन सादर केलं आहे. मोटोरोलानं या तंत्रज्ञानाला यापूर्वी Motorola One Hyper असं नाव दिलं होतं. परंतु आता कंपनीनं याचं नाव बदलून Motorola Air Charging असं केलं आहे.
दरम्यान, मोटोरोलाच्या ट्रू वायरलेस चार्जिंगचं न केवळ नाव बदललंय, परंतु याच्या प्रोटोटाईपचंदेखील काम पूर्ण झालं आहे. चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर आलेल्या एका ऑफिशिअल अनाऊंसमेंटनुसार मोटोरोला एअर चार्जिंग टेक्नॉलॉजीसोबत एका वेळी 4 डिव्हाईसेस चार्ज करता येऊ शकतात. तसंच ते 3 मीटर रेज आणि 100° वर काम करतं.
डिव्हाईसमध्ये 1600 अँटिनाकंपनीनं दिलेल्या माहितीनुसार या डिव्हाईसमध्ये 1600 अँटिनांचा वापर करण्यात आला आहे. याच्या मदतीनं डिव्हाईस सातत्यानं स्कॅन करण्यात येते. नेटवर्क सेटअप, चिपसेट आणि अल्गोरिदमच्या मदतीनं युझर्सना स्टेबल चार्जिंग मिळत असल्याचा दावाही कंपनीनं केला आहे. जर याच्या मध्ये कोणतीही व्यक्ती आली तर सुरक्षेच्या दृष्टीनं आपोआप चार्जिंग थांबवलं जातं. बायोलॉजिकल मॉनिटरिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीनं हे डिव्हाईस मानवाची उपस्थिती माहित करून घेतं.