नवी दिल्ली : Motorola ने सर्वात स्वस्त Motorola Moto G 5G स्मार्टफोन बाजारात आणून धुमाकूळ उडवून दिलेला असताना आता आणखी एक गेम खेळला आहे. यामुळे सर्वात स्वस्त स्मार्टफोन देणाऱ्या शाओमीला धक्का बसला आहे. शाओमीनेही ५जी फोन लाँच केला असा तरीही मोटरोलाची किंमत त्यांना ठेवता आलेली नाही. आता मोटरोलाने आणखी एक स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे.
मोटरोलाने फ्लॅगशिप स्मार्टफोन Motorola Edge चे छोटे रुप लाँच केले आहे. यामध्ये एकापेक्षा एक स्पेसिफिकेशन्स आहेत. 6 कॅमेरा, Qualcomm Snapdragon 870 Soc प्रोसेसर, 6.7 इंच LCD स्क्रीन आणि 90Hz डिस्प्ले रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले असा फोन चीनमध्ये 1999 युआन म्हणजेच 22,545 रुपयांत लाँच केला आहे.
Motorola Edge S Variants PriceMotorola Edge S चे ३ व्हेरिअंट लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये 6 GB RAM + 128 GB स्टोरेजचे व्हेरिअंट 1999 युआन, 8 GB RAM + 128 GB स्टोरेज व्हेरिअंट 2399 युआन म्हणजेच 27,057 रुपये आणि 8 GB RAM + 256 GB स्टोरेज व्हेरिअंट 2799 युआन म्हणजेच 31,557 रुपयांना लाँच करण्यात आले आहेत.
Motorola Edge S SpecificationsMotorola Edge S मध्ये 6.7 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीन रिझॉल्यूशन 1080x2520 पिक्सल आहे. Android 11 देण्यात आली असून Qualcomm SM8250-AC Snapdragon 870 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. मोटोरोलो एज एसला क्वाड रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी सेन्सर 64 मेगापिक्सलचा आहे. सेकंडरी कॅमेरा 16 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस आहे. यानंतर 2 मेगापिक्सलचे डेप्थ सेन्सरसोबत TOF 3D कॅमेरा देण्यात आले आहे.
Motorola Edge S मध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा आहे. यामध्ये १६ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. सेकंडरी सेन्सर 8 मेगापिक्सलचा आहे. यामध्ये 100 डिग्री अल्ट्रावाईड फीटर देण्यात आले आहे. या फोनला 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 20W फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे. लवकरच हा फोन भारतातही लाँच होणार आहे.