मुंबई : मोझिलाने (Mozilla) आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची नवी आवृत्ती लॉंच केली आहे. फायरफॉक्स क्वांटम (Firefox Quantum) असे या आवृत्तीचे नाव असून गेल्या 13 वर्षांत दिल्या जाणा-या या अपडेटमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.फायरफॉक्स क्वांटम हा ब्राऊजर विंडोज, मॅक,एन्ड्रॉईड आणि आयओएस या ऑपरेटिंग सिस्टिमसाठी बनविण्यात आला आहे. अतिशय गतीमान असणारे फायरफॉक्स क्वांटम ब्राऊजर सर्व युजर्सला डाऊनलोडसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे हे ब्राऊजर गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एजला मोठी टक्कर देण्याची शक्यता आहे. मोझिलाने दिलेल्या माहितीनुसार, फायरफॉक्स क्वांटम या ब्राऊजरचे कोर इंजिन पूर्णपणे नवीन टेक्नॉलॉजीच्या आधारे बदलण्यात आले आहे. डिझाईन सुद्धा नवीन आहे आणि पहिल्यापेक्षा जास्त जलद आहे. 2004 मध्ये फायरफॉक्स 1.0 लॉंच करण्यात आले होते. त्यानंतर अपडेट व्हर्जनमध्ये बदल करण्यात आलेले फायरफॉक्स क्वांटम हे सर्वात मोठे ब्राऊजर आहे. तसेच, या फायरफॉक्स क्वांटम ब्राऊजरमध्ये सुटसुटीत चौरसाकृती टॅब देण्यात आल्या आहेत. तर बुकमार्क, हिस्टरी, स्क्रीनशॉट,डाऊनलोड आदींसाठी यात क्विक अॅक्सेस प्रदान करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्याच्या अखेरीस मोझिला कंपनीने आपल्या फायरफॉक्स ब्राऊजरची 57वी आवृत्ती डेव्हलपर्स प्रिव्ह्यूच्या माध्यमातून प्रयोगात्मक (बीटा ) स्थितीत सादर केली होती. याला फायरफॉक्स क्वाँटम हे नाव देण्यात आले होते. ही नवीन आवृत्ती आधीपेक्षा जवळपास दुप्पट इतकी गतीमान असल्याचा मोझिलाचा दावा आहे.
मोझिलाचे नवीन ब्राऊजर लॉन्च, गुगल क्रोमला देणार टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 3:47 PM
मोझिलाने (Mozilla) आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची नवी आवृत्ती लॉंच केली आहे. फायरफॉक्स क्वांटम (Firefox Quantum) असे या आवृत्तीचे नाव असून गेल्या 13 वर्षांत दिल्या जाणा-या या अपडेटमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देफायरफॉक्स ब्राऊजरची नवी आवृत्ती लॉंच गुगल क्रोमला देणार टक्कर 2004 मध्ये फायरफॉक्स 1.0 लॉंच करण्यात आले होते