गरीबांना स्वस्तात मोबाइल खरेदी करता यावा यासाठी मोबाईलवरस सब्सिडी देण्याची मागणी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी केली. मुकेश अंबानी यांनी इंडिया मोबाइल काँग्रेस २०२१ मध्ये यावर भाष्य केलं. “सरकारी युनिव्हर्सल ऑब्लिगेशन फंडाचा वापर देशात मोबाइल सब्सिडी देण्यासाठी केला गेला पाहिजे. देशातील लोकांना जर डिजिटल ग्रोथचा भाग बनायचं असेल तर त्यांना परवडणाऱ्या दरात सेवा आणि डिव्हाइस उपलब्ध करुन दिली पाहिजे,” असं ते म्हणाले.
८ डिसेंबर रोजी मोबाइल इंडिया काँग्रेस २०२१ ची सुरुवात झाली. १० डिसेंबरपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. या कार्यक्रमात बोलताना मुकेश अंबानी यांनी 5G सेवा रोलआऊट करणं हे जियोचं प्राधान्य असल्याचं म्हटलं. “आम्ही १०० टक्के स्वदेशी आणि व्यापक 5G तंत्रज्ञान विकसित केलं आहे. हे पूर्णपणे क्लाऊड नेटिव्ह, डिजिटल मॅनेज्ड आणि भारतीय आहे. आमच्या या तंत्रज्ञानाच्या मदतीनं जिओ नेटवर्कला लवकरात लवकर 4G वरून 5G वर अपग्रेड केलं जाऊ शकतं,” असंही ते म्हणाले.
डिजिटस ग्रोथसाठी स्वस्त फोन आवश्यकभारताला 2G मधून 4G आणि नंतर 5G मध्ये मायग्रेशन लवकरात लवकर पूर्ण करायला हवं. लाखो भारतीयांना 2G तंत्रज्ञानापर्यंत मर्यादित ठेवणं म्हणजे त्यांना डिजिटल क्रांतीच्या लाभांपासून वंचित ठेवणं हे आहे. कोरोना महासाथीदरम्यान जेव्हा सर्वकाही बंद होतं तेव्हा केवळ इंटरनेट आणि मोबाइलमुळेच अनेक फायदे झाले. तंत्रज्ञान आपल्या जीवनाच आणि रोजगारासाठी मदतीचं ठरत असल्याचंही अंबानी म्हणाले.