नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून ते सातत्याने युजर्ससाठी भन्नाट फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच युजर्सना एक अकाऊंट हे मल्टीपल डिव्हाईसमध्ये एकाच वेळी वापरता येणार आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, सध्या हे फीचर फायनल स्टेजमध्ये आहे. तसेच व्हॉट्सअॅप आता ते बीटा अॅपसाठी जारी करणार आहे.
रिपोर्टच्या माहितीनुसार, मल्टिपल डिव्हाईस फीचर आल्यानंतर युजर्स एकाचवेळी 4 डिव्हाईसमध्ये एकाच व्हॉट्सअॅप अकाऊंटचा वापर करू शकणार आहेत. व्हॉट्सअॅप 2009 मध्ये लाँच करण्यात आल्यानंतर युजर्स या फीचरची सातत्याने मागणी करीत आहेत. आता व्हॉट्सअॅप केवळ एकाच डिव्हाईसमध्ये एकाच वेळी वापरता येतं. व्हॉट्सअॅपच्या डेस्कटॉप व्हर्जनसाठी वापरता येतं ज्यावेळी स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरू असेल.
मस्तच! आता Google सांगणार तुम्हाला कोण करतंय कॉल?, TrueCaller ला टक्कर
जबरदस्त! WhatsApp ची कमाल सेटिंग, कोणीच वाचू शकणार नाही तुमचं चॅटिंग
व्हॉट्सअॅपने नुकतेच आलेल्या 6 बगला फिक्स केले होते. व्हॉट्सअॅपने ही समस्या दूर करून याची माहिती एक सिक्योरिटी अॅडव्हायझरी वेबसाइटवर जारी केली होती. या ठिकाणी युजर्सला अॅपच्या सिक्योरिटी अपडेट्ससाठीची एक पूर्ण यादी मिळणार आहे. व्हॉट्सअॅप नवीन वेबसाईट द्वारे ज्या काही कमतरता आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अॅप कम्यूनिटीततील कमतरता ट्रॅक करण्यासाठी एक ठिकाण असायला हवे. कारण व्हॉट्सअॅप नवीन व्हर्जनसोबत रिलीज नोटमध्ये सिक्योरिटी रिकमंडेशन जारी करण्यास नेहमी सक्षम नाही होत असं कंपनीने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अरे व्वा! WhatsApp चॅटिंगची गंमत वाढणार, एकाच बटणाने व्हॉईस, व्हिडीओ कॉलिंग करता येणार
व्हॉट्सअॅपने अशीच आणखी काही भन्नाट फीचर्स आणली आहे. व्हॉट्सअॅपने कॅटलॉग शॉर्टकट, व्हॉट्सअॅप डूडल आणि न्यू कॉल बटण अशी तीन जबरदस्त फीचर्स आणली आहेत. WABetaInfo ने दिलेल्या एका रिपोर्टनुसार,अँड्रॉईड बीटाच्या लेटेस्ट कोडवर हे फीचर्स दिसले आहेत. व्हॉट्सअॅप संबंधित बातमी आणि अपडेटला ट्रॅक करणारी वेबसाईट WABetaInfo ने या नवीन फीचर्ससाठी व्हॉट्सअॅपला बीटा व्हर्जन 2.20.200.3 ची गरज असल्याचं सांगितलं आहे. रिपोर्ट्सनुसार, सध्या नवीन कॉल बटणाची टेस्टिंग केली जात आहे. नवीन कॉल बटणला कंपनी सुरूवातीला बिजनेस चॅट्ससाठी ऑफर करणार आहे. नवीन कॉल बटण हे व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलसाठी शॉर्टकट म्हणून देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
कोरोनावर मात केल्यावर भाजपा आमदाराला 'अत्यानंद', मास्क न लावता मंदिरात केला डान्स
"जो शेतकरी जमिनीतून सोने उगवतो, त्याच्या डोळ्यांत मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणतंय"
PUBG खेळता खेळता 'ती' प्रेमात पडली, पार्टनरसाठी घर सोडलं अन्...
"मोदीजी, शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवताहेत; सरकारचा कृषि विरोधी काळा कायदा"