इन्स्टाग्रामचा वापर करणार्यांची संख्या वेगाने वाढत आहे. यात बरेचसे युजर्स अनेकदा दिवसभरातून अनेकदा पोस्ट टाकत असतात. अशांना अनफॉलो करण्याची सुविधा सध्या इन्स्टाग्रामवर देण्यात आलेली आहे. तथापि, अनेकदा आपण आपल्या निकटवर्तीयांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो करू शकत नाही. नेमकी ही अडचण लक्षात घेऊन म्युट हे फिचर सादर करण्यात आले आहे. यामध्ये आपण ज्या युजरला म्युट करणार आहोत, त्याच्या पोस्ट आपल्याला दिसणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण त्याला म्युट केल्याची कोणत्याही प्रकारचा सुगावा त्या युजरला लागणार नाही. यामुळे त्रासदायक ठरणार्या युजरच्या पोस्ट आपल्याला न्यूजफिडमध्ये दिसणार नाहीत. तसेच त्याने अपलोड केलेल्या स्टोरीजदेखील दिसणार नाहीत. याच्यासाठी कोणत्याही युजरच्या पोस्टच्या उजव्या बाजूस वर असणार्या तीन टिंबावर क्लिक करावे लागणार आहे. यावर क्लिक केल्यावर अन्य पर्यायांसोबत म्युट करण्याचा पर्यायदेखील दिसणार आहे. यावर क्लिक केल्यावर संबंधीत युजर म्युट केला जाणार आहे.
इन्स्टाग्रामच्या अँड्रॉइड तसेच आयओएस प्रणालीच्या युजर्ससाठी म्युट हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. जगभरातील युजर्सला ते क्रमाक्रमाने अपडेटच्या माध्यमातून देण्यात येत आहे.