Google ने अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी सादर केलेले फाईल शेयरिंग फिचर Nearby Share इतके लोकप्रिय नाही. हे फीचर गुगलने 2019 मध्ये सादर केले होते. तरीही अनेक अँड्रॉइड युजर्स एका अँड्रॉइड फोनमधून दुसऱ्या अँड्रॉइड फोनमध्ये फाईल शेयर करण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्सचा वापर करतात. थर्ड पार्टी अॅप्स तुमच्या डेटा सिक्योरिटीसाठी धोकादायक असू शकतात. त्यामुळे Nearby Share फिचर तुम्हाला सुरक्षित फाईल ट्रान्सफर करण्यास मदत करू शकते. Nearby Share फीचरच्या मदतीने एका अँड्रॉइडवरून दुसऱ्या अँड्रॉइडमध्ये फाईल शेयर करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
Nearby Share फीचर Android 6.0 किंवा त्यावरील अँड्रॉइड व्हर्जनवर वापरता येईल. हे फीचर प्रत्येक अँड्रॉइड फोनमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही याआधी हे फिचर वापरले नसेल तर सर्वप्रथम हे फिचर अॅक्टिव्हेट करावे लागेल. त्यासाठी:
- सर्वप्रथम Settings मध्ये जा आणि स्क्रोल करून Google सिलेक्ट करा.
- त्यानंतर Device Connections वर क्लिक करा, इथे स्क्रोल केल्यावर तुम्हाला Nearby Share चा पर्याय मिळेल.
- Nearby Share वर टॅप करा त्यानंतर सेटिंग्स कस्टामाइज करा.
- इथे तुम्ही हे फिचर ऑन किंवा ऑफ करू शकता. या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमचे डिवाइसचे नाव आणि गुगल अकॉउंटची निवड करावी लागेल.
Nearby Share: How to use and transfer files
- सर्वप्रथम जी फाईल शेयर करायची आहे त्यावर टॅप करा आणि त्यानंतर शेयर आयकॉनवर क्लिक करा.
- आता तुम्हाला Nearby Share पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या जवळपास असलेले डिवाइस सर्च करण्यास सुरु होईल.
- ज्या डिवाइसवर फाईल पाठवायची आहे त्यात Nearby Share फीचर ऑन असणे आवश्यक आहे.
- फोन डिटेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या फोनच्या नावावर टॅप करावे लागले. तसेच दुसऱ्या युजरने ती रिक्वेस्ट स्वीकारावी लागेल.
- त्यानंतर फाईल शेयर होण्यास सुरुवात होईल आणि काही वेळात प्रक्रिया पूर्ण होईल.