नेटफ्लिक्स जगातील सर्वात मोठी स्ट्रीमिंग कंपनी आहे. परंतु युजर्स वाढवण्यासाठी आणि असलेले युजर्स टिकवून ठेवण्यासाठी Netflix आपल्या अॅपमध्ये नवनवीन प्रयोग करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर गेम सादर केले होते. यात Stranger Things: 1984 (BonusXP), Stranger Things 3: The Game (BonusXP), Shooting Hoops (Frosty Pop), Card Blast (Amuzo & Rogue Games) आणि Teeter Up (Frosty Pop) या गेम्सचा समावेश होता. आता नेटफ्लिक्स आपल्या iOS अॅपवर लहान मुलांसाठी एक नवीन फीड टेस्ट करत आहे.
नेटफ्लिक्सने Kids Clips नावाची नवीन फीड अॅपमध्ये सादर केली आहे. नेटफ्लिक्स किड्स क्लिपचा युजर इंटरफेस शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म TikTok आणि Instagram Reels सारखा दिसत आहे. या फीडमध्ये नेटफ्लिक्स लहान मुलांसाठी कंटेंट दाखवेल. जिथे लहान मुलांसाठी खास बनवलेल्या शॉर्ट क्लिप्स दिसतील, अशी माहिती द वर्जच्या रिपोर्टमधून मिळाली आहे.
Kids Clips या फिचरच्या आधी Netflix ने यावर्षीच्या सुरुवातीला “Fast Laughs” फीचर देखील सादर केले होते. फास्ट लाफमध्ये कॉमेडी क्लिप्सचा समावेश होता. किड्स क्लिप फीडमध्ये पोट्रेट फॉरमॅटमध्ये लँडस्केप व्हिडीओ दिसतील. कंपनी एकावेळी 10 ते 20 क्लिप दाखवणार आहे, जेणेकरून युजर्सचा जास्त वेळ वाया जाणार नाही. कारण नेटफ्लिक्सने टिकटॉक लोकांचा वेळ वाया घालवत असल्याचा काही दिवसांपूर्वी आरोप केला होता.
Kids Clips फीचर नेटफ्लिक्सने या आठवड्यात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि लॅटिन अमेरिकेत सादर केलं आहे. हे फिचर आयओएसवर उपलब्ध आहे, अँड्रॉइड युजर्सना याचा वापर करता येत नाही.