Netflix Password Sharingसध्या इतके OTT प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झाले आहेत की ते परवडत नाहीत. त्यामुळे युजर्स एक अकाऊंट शेयर करतात. अनेकजण Netflix चा पासवर्ड मित्रांना देतात आणि प्लॅनचे पैसे देखील स्प्लिट करून भरतात. परंतु, लवकरच Netflix चं अकाऊंट शेयर करणं महागात पडू शकतं. कंपनी यासाठी पैसे आकारण्याची योजना बनवत आहे.
लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स अशा लोकांकडून नेटफ्लिक्सचा वापर सुरु ठेवण्यासाठी अतिरिक्त शुल्क मागू शकते. कंपनीचे प्रोडक्ट इनोव्हेशन डायरेक्टर चेंगई लॉन्ग यांनी एका ब्लॉग पोस्टमधून म्हटलं आहे की, पासवर्ड घराच्या बाहेर शेयर केल्यामुळे आमची चांगल्या कन्टेन्टमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता कमी होते.
एक ब्लॉग पोस्टमध्ये चेंगई लॉन्ग ने कहा कि कंपनी सर्वप्रथम चिली, कोस्टा रिका आणि पेरूमध्ये “add an extra member” फीचरची टेस्टिंग करेल. अतिरिक्त मेंबरला वेगळी लॉगिन आणि पासवर्ड मिळेल. तसेच त्या मेंबरला जवळपास 2 ते 3 डॉलर्स (देशानुसार) दरमहिना अतिरिक्त द्यावे लागतील, अशी माहिती लॉन्ग यांनी ब्लॉग पोस्टमध्ये दिली आहे.
युजर्स आपलं प्रोफाईल नवीन अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करू शकतील. जास्तीत जास्त दोन सब अकाऊंट जोडता येतील. येत्या काही आठवड्यांत हे फिचर फीचर रोल आउट करण्यात येईल. टेस्टिंग केल्यानंतरच हे फिचर उपरोक्त देशांच्या बाहेर सादर करायचं की नाही हे ठरवण्यात येईल, असं कंपनीनं सांगितलं आहे.
नेटफ्लिक्सनं गेल्यावर्षी 221.8 मिलियन युजर्स जोडले होते. जे त्यांच्या वार्षिक टार्गेट पेक्षा थोडे कमी होते. लॉकडाउनमध्ये नेटफ्लिक्सची भरभराट झाली होती. परंतु 2022 च्या पहिल्या तिमाहीतील आकडे चांगले दिसत नाहीत. कंपनीच्या ताज्या रिपोर्ट्सनुसार फक्त 2.5 मिलियन नवीन युजर्स जोडले जाऊ शकतात.