मुंबई : स्मार्ट ४ प्लस, स्मार्ट ४ एचडी २०२१ च्या यशानंतर इन्फिनिक्स (Infinix) हा ट्रान्सशन ग्रुपचा स्मार्टफोन ब्रँड भारतीय स्मार्टफोन बाजाराला पुन्हा एकदा 'स्मार्ट ५' या नव्या फोनद्वारे आश्चर्याची भेट देण्यासाठी सज्ज आहे. नव्याने लाँच केलेला स्मार्ट फोन हा मोठा, अधिक चांगला आणि कामगिरीमध्ये उत्कृष्ट आहे. या किंमतीच्या श्रेणीतील अनेक सुविधा प्रथमच अशा स्मार्ट5 मध्ये उपलब्ध असून त्यात ६०००एमएएचची बॅटरी देखील आहे. तसेच ६.८२” चा डिस्प्ले असून हेलिओ जी२५ ऑक्टा कोअर प्रोसेसर आहे. स्मार्ट५ हा मोरांडी ग्रीन, पर्पल, एगिन ब्लू आणि ऑपसिडिअन ब्लॅक या प्रमुख ४ रंगात उपलब्ध होणार आहे. फ्लिपकार्टवर ७१९९ रुपये किंमतीत १८ फेब्रुवारीपासून उपलब्ध आहे. (Infinix Smart 5 launched in India with Helio G25 chipset and 6,000 mAh battery.)
स्मार्ट ५च्या प्रत्येक डिव्हाइसमध्ये ४००० रुपये किंमतीची जिओ ऑफर, २००० रुपये किंमतीचे जिओ कॅशबॅक वाऊचर (५० रुपयांचे वाऊचर प्रत्येक 349 रुपये रिचार्जवर) आणि २००० रुपये किंमतीचे पार्टनर ब्रँड कूपन्सची अतिरिक्त ऑफर आहे.स्मार्टफोनमध्ये ६.८२” एचडी+ सिनेमॅटिक ड्रॉप नॉच डिस्प्ले व ९०.६६% स्क्रीन टू बॉडी रेशो लाँग देण्यात आले आहे. स्क्रीन नॅरो बेझलसह, आस्पेक्ट रेशो २०.५:९ आहे, जेणेकरून टीव्ही मालिका, चित्रपट, म्युझिक व्हिडिओ किंवा कोणताही मनोरंजनाचा कंटेंटचा आनंद घेता येतो. स्मार्ट ५ ला हेलिओ जी२५ ऑक्टा कोअर प्रोसेसर असून त्यात २.० गिगाहर्ट्झपर्यंत स्पीडचे सीपीयू क्लॉक आहे.
बापरे! तुमच्याही स्मार्टफोनमध्ये 'हे' App आहे?; लगेचच करा डिलीट नाहीतर फोन होऊ शकतो हॅक
२ जीबीची रॅम, ३२ जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध असलेल्या स्मार्ट५ फोनमध्ये ३ कार्ड स्लॉट (ड्युएल नॅनो सिम + मायक्रो एसडी) असून त्याची मेमरी २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. तो अँड्रॉइड १० वर ऑपरेट होत असून नव्या एक्सओएस ७ स्किनसह येतो. ज्याद्वारे यूझरला अधिक सहजपणे व वेगवान सॉफ्टवेअर युएक्स मिळते व त्यातून स्क्रीनवरील आयकॉन वेगाने रिफ्रेश होतात.
मस्तच! आता घरबसल्या तपासा 'या' महिन्यात गॅस सिलिंडरवर तुम्हाला किती मिळणार सबसिडी?; जाणून घ्या कसं
बॅटरीस्मार्ट५ फोनमध्ये हेवी ड्युटी ६००० एमएएच बॅटरी असून त्यात अल्ट्रा पॉवर मॅरेथॉन टेक्नोलॉजी आहे. ज्याद्वारे अॅपकडून कमी पॉवर वापरली जाते व २५% पर्यंत बॅटरी बॅकअप वाढते. त्यामुळे अनेक तास भरपूर वापर केल्यानंतरही स्मार्टफोन कार्यरत राहतो. बॅटरी ५० दिवसांपेक्षा जास्त स्टँडबाय टाइम, नॉनस्टॉप व्हिडिओ प्लेबॅक २३ तास, ५३ तासांचा ४जी टॉकटाइम, १५५ तासांचे म्युझिक प्लेबॅक, २३ तासांचे वेब सर्फिंग आणि १४ तास गेमिंग करता येते.
कॅमेरा...यात १३ एमपी एआय ड्युएल रिअर कॅमेरा येत असून त्यात क्वाड एलईडी फ्लॅश व एफ/१.८ लार्ज अपार्चर येते. याद्वारे फोटोची हौस असलेल्यांसाठी अगदी लहान गोष्टींतील बारकावे खूप कमी प्रकाशातही स्पष्ट दिसतात. स्मार्ट५ च्या अॅडव्हान्स कॅमेऱ्यात, या श्रेणीअंतर्गत प्रथमच स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्डिंग फिचर देण्यात आले आहे. यामुळे कॅमेरा इंटरफेसवरच सुपर स्लो मोशन व्हिडिओ एडिट करता येतात. या स्मार्टफोनमध्ये ८ एमपी सेल्फी कॅमेरा, एफ/२.० अपार्चर व एलईडी फ्लॅश, एआय आधारीत ब्युटी मोड व मल्टीपल कॅमेरा मोड्स आहेत. त्यात परफेक्ट पिक्चरसाठी पोर्ट्रेड, वाइड सेल्फी इत्यादी मोड्सचा समावेश आहे.
टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....