फोरजी मध्यए थेट एन्ट्री करून रिलायन्स जिओने अख्खा बाजार उचलला होता. यानंतर काही महिन्यांनी व्होडाफोन, एअरटेल या कंपन्यांना ही सेवा सुरु करता आली होती. आता काहीसे तसेच ५जी वेळी होण्याची शक्यता आहे. एक नवी कंपनी बाजारात धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे.
२६ जुलै रोजी ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव आहे. यासाठी चार कंपन्यांनी भाग घेतला आहे. यामध्ये एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडीया आहेच परंतू चौथी कंपनी ही अब्जाधीश गौतम अदानींची आहे. यामुळे अदानी ग्रुप थेट ५जी मध्ये एन्ट्री करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अदानी टेलिकॉम सेक्टरमध्ये आले तर पुन्हा एकदा प्राईस वॉ़र सुरु होण्याची शक्यता आहे.
अदानी ग्रुपने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या लिलावात कोणकोणत्य़ा कंपन्या भाग घेणार आहेत याची नावे १२ जुलै रोजी समजणार आहेत. या लिलावात ज्यांची अल्ट्रा हाय स्पीड कनेक्टिव्हीटी देण्याची कुवत आहे अशाच कंपन्यांना भाग घेता येणार आहे. यामुळे टूजी, थ्री जी आणि फोर जी वेळी ज्या चुका झाल्या त्या टाळता येणार आहेत. लिलावात गैर टेलिकॉम कंपन्यांनी बाजी मारली होती. टेलिकॉम कंपन्यांना जे स्पेक्ट्रम हवे होते, ते त्यांना मिळाले नव्हते. मग ते या कंपन्यांकडून विकत घ्यावे लागले होते.
रिपोर्टनुसार अदानी ग्रुपच्या नव्या टेलिकॉम कंपनीला नॅशनल लाँग डिस्टन्स आणि इंटरनॅशनल लाँग डिस्टन्सचे लायसन मिळाले आहे. याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 2015 पासून, देशभरात 4G सेवांचा झपाट्याने विस्तार होत आहे, ज्यामुळे डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 5 जी स्पेक्ट्रमची एकूण किंमत सुमारे 5 लाख कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा लिलाव 20 वर्षांसाठी केला जाणार आहे.