शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

काय? नव्या आयफोनमध्ये भारतातील सिमकार्ड चालणार नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 4:59 PM

भारतात सध्या अस्तित्वात असलेली सिमकार्ड त्यात चालणार नाहीत. हे फोन पहिल्यांदाच ड्युअल सिमकार्ड स्लॉटसह येणार असले तरीही त्यात एक स्लॉट ई-सिमचा असणार आहे.

अॅपलने आयफोन एक्स बंद करून तीन नवे त्यापेक्षा महागडे फोन लाँच केले असले तरीही हे फोन भारतात वापरायला मिळतील का, असा प्रश्न उभा ठाकणार आहे. याला कारण भारतात सध्या अस्तित्वात असलेली सिमकार्ड त्यात चालणार नाहीत. हे फोन पहिल्यांदाच ड्युअल सिमकार्ड स्लॉटसह येणार असले तरीही त्यात एक स्लॉट ई-सिमचा असणार आहे. यामुळे या फोनमध्ये भारतीयांना सध्यातरी एकच सिम वापरता येणार आहे.

अॅपलने iPhone XS, iPhone XS Max आणि XR नुकताच लाँच केला. या फोनचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे तो पहिल्यांदाच ड्युअल सिम प्रकारात आला आहे. भारतासह बऱ्याच देशांमध्ये ड्युअल सिमच्या फोनची चलती आहे. बरेचसे ग्राहक यामुळेच अॅपलपासून लांब राहत होते. परंतू, अॅपलने लाँच केलेले मोबाईल हे साधे सिम आणि ई-सिम अशा दोन सिमकार्डना सपोर्ट करणार आहेत. मात्र, अमेरिकेतही अद्याप ई-सिम मिळत नसून भारतात येणे जरा कठीणच दिसत आहे. 

भारतात सीडीएमएची जागा जीएसएम सिम कार्डने घेतली होती. आता ई-सिम हे जीएमएमच्या संघटनेने तयार केलेले व नव्या नियमावलीचे सिम आहे.  जीएमएमए ही संघटना जगभरातील सर्व नेटवर्क ऑपरेटरचे प्रतिनिधीत्व करते. हे एक इंटिग्रेटेड सिम असून ते फोनमध्येच बसविलेले असते. त्याला वेगळे करता येऊ शकत नाही. 

पहिल्यांदा या प्रकारचे सिम 2016 मध्ये सॅमसंगच्या गियर एस2 थ्रीजी मध्ये वापरण्यात आले होते. हे सिम साध्या सिमचेही काम करते. शिवाय यामध्ये मशिन टू मशिन आणि रिमोट प्रोविज़निंग क्षमता आहे.

 जीएसएमपेक्षा तुलनेने हे सिम खूपच छोटे असल्याने ते मोबाईल किंवा स्मार्ट वॉचमध्ये बसविल्याने त्यांची जाडीही कमी होणार आहे. मात्र, सध्या अशा प्रकारच्या सिमची सेवा देणाऱ्या कंपन्या फारच थोड्या देशांमध्ये आहेत. 9 देशांमध्येच सध्या या प्रकारच्या सिम चालतात. तेही काही कंपन्यांद्वारेच सेवा पुरविली जाते. यामध्ये भारतही आहे. मात्र, या सिमवर सेवा पुरविणारे फारच कमी ऑपरेटर आहेत. यामुळे अॅपलने एअरटेल आणि जियो सोबत यासाठी करार केला आहे.

टॅग्स :Apple IncअॅपलApple iPhone Xअ‍ॅपल आयफोन XAirtelएअरटेलJioजिओ