नवी दिल्ली - मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ट्विटर आपल्या युजर्ससाठी फीचर आणत असतं. संवाद अधिक पारदर्शी करता यावा यासाठी ट्विटर लवकरच एक नवीन फीचर रोलआऊट करणार आहे. ट्विटरवरील थ्रेड अचानक डिलीट झाल्यास ते थ्रेड का गायब झाले याचं स्पष्टीकरण ट्विटर देणार आहे. काही आठवड्यात हे फीचर युजर्सना दिसणार आहे. 'This tweet is unavailabe' च्या जागी ते ट्वीट का गायब झालं याचं कारण दिसणार आहे.
ट्विटरवर अनेकदा काही कन्व्हर्सेशनचे ट्वीट गायब झालेले दिसतात. त्यामुळे एखाद्या गोष्टीची जास्तीची माहिती मिळत नाही. ट्वीट गायब झाल्याने लोक गोंधळून जातात. त्यामुळेच ट्विटर आता युजर्सना ट्वीट का गायब झालं यामागचं कारण सांगणार आहे. प्रामुख्याने ट्वीट गायब झाल्यावर 'This tweet is unavailable' असं दाखवण्यात येतं. मात्र आता नवं फीचर रोलआऊट झाल्यावर गायब झाल्यामागचं नेमकं कारण आणि तपशील मिळणार आहे.
गुरुवारी (12 जुलै) ट्विटर रात्रभर डाऊन झालं होतं. यामुळे जगभरातील ट्विटर युजर्स रात्रभर त्रासले होते. अनेकांनी ट्विटर तसेच इतर सोशल मीडियाच्या माध्यमांवर यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ट्विटरविरोधात संतापही व्यक्त केला. ट्विटर सुरू झाल्यानंतरही ट्विटरवरही यूजर्सनी ट्विटर का बंद झालं? याबाबतचे प्रश्न उपस्थित केले होते. या दरम्यान ट्विटरने 'आम्हाला मिस केलंत का?' असं एक ट्वीट केलं होतं. त्यावर युजर्सनेही फनी मीम्स शेअर करून त्यांना उत्तर दिलं आहे. कंपनीचे सीईओ जॅक यांनीही ट्विट केलं होतं. 'ट्विटर अकाउंट डाऊन झालं होतं. मात्र हळूहळू ट्विटर सेवा पूर्वपदावर येत आहे. त्याबद्दल दिलगीर आहोत. आमच्या ऑपरेशन्स आणि इंजिनीयरिंग टीमने प्रचंड मेहनत घेऊन ट्विटर पुन्हा पूर्वपदावर आणलं. त्यांचे आभार' असं ट्वीट जॅक यांनी केले होते.
खूशखबर! Twitter वर आता एडिट करता येणार ट्वीट; फायदेशीर ठरणार नवं फिचर
सोशल मीडियावर एखादी गोष्ट पोस्ट केल्यानंतर त्यामध्ये चूक असल्यास अथवा अन्य काही कारणांमुळे ती पोस्ट एडिट करायची असल्यास एडिटचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र Twitter वर ट्वीट एडिट करता येत नाही. ट्वीटर युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण फेसबुकप्रमाणेच आता लवकरच ट्वीट एडिट करता येणार आहे. एडिटसाठी Twitter एक नवीन फीचर लॉन्च करणार आहे. ट्वीटरच्या या फीचरद्वारे युजर्सना एडिट केलेले ट्वीट दिसणार आहे मात्र याआधी केलेले मूळ ट्वीटही दिसणार आहे. ट्वीट एडिट करण्यासाठी आणण्यात येणाऱ्या नव्या फीचरचा युजर्सला फायदा होणार आहे. युजर्सकडे ते ट्वीट डिलीट करण्यासाठी 5 ते 30 सेकंदाचा वेळ असणार आहे. त्याच विंडोमध्ये युजर्स ते एडिट करू शकतात.