नवी दिल्ली : भारतात तीन प्रमुख खाजगी टेलिकॉम ऑपरेटर आहेत, त्यापैकी एक व्होडाफोन आहे. ही कंपनी आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन प्लॅन आणत असते. यावेळीही कंपनीने एक नवीन प्लॅन आणला आहे.
Vodafone Idea (Vi) ने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक नवीन मोबाईल रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. टेलिकॉमने 181 रुपयांचा नवीन प्लॅन जोडला आहे. हा एक 4G डेटा व्हाउचर प्लॅन आहे, जो सध्याच्या प्लॅनमध्ये अॅड ऑन म्हणून खरेदी केला जाऊ शकतो.
Vi च्या 181 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1GB इंटरनेट डेटा मिळतो. प्लॅनची व्हॅलिडिटी 30 दिवसांची आहे. दरम्यान, तुम्ही तुमच्या कोणत्याही विद्यमान प्लॅनसह ते वापरू शकता, जे तुम्हाला अतिरिक्त डेटाची आवश्यकता असल्यास तुम्हाला मदत करेल.
काय आहे प्लॅन?कंपनीने मोबाइल डेटा, व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससह दोन प्रीपेड प्लॅन आधीच लाँच केले आहेत. यामध्ये 289 रुपये आणि 429 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 79 दिवसांपर्यंत आहे. या दोन्ही योजना Vi अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
हे आहेत इतर प्लॅनVi च्या 289 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 48 दिवस आहे. हे अनलिमिडेट कॉलिंग आणि दररोज 600 एसएमएस ऑफर करते. प्लॅनमध्ये एकूण 4GB मोबाइल डेटा आहे. याचप्रमाणे, Vi च्या 429 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिडेट व्हॉइस कॉलिंग डेटा आणि 1000 एसएमएस येतो. प्लॅन 78 दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी मोबाइल डेटा ऑफर करतो. दरम्यान, Jio आणि Airtel कडून देखील तुम्हाला असे अनेक प्लॅन देण्यात येतात.