शाओमी आपल्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत नवीन स्मार्ट टीव्ही भारतात सादर करणार आहे. 22 सप्टेंबरला होणाऱ्या एका इव्हेंटच्या माध्यमातून हा स्मार्ट टीव्ही ग्राहकांच्या भेटीला येईल. नवीन Redmi स्मार्ट टीव्हीचा एक टीजर पोस्टर समोर आला आहे. या पोस्टरनुसार हा टीव्ही 32-इंच आणि 43-इंचाच्या दोन मॉडेल्ससह सादर केला जाईल. तसेच हा लाँच इव्हेंट 22 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता सुरु होईल.
Xiaomi ने नवीन स्मार्ट टीव्हीच्या लाँचसाठी Xiaomi India च्या अधिकृत वेबसाईटवर एक नवीन वेबपेज लाईव्ह केले आहे. इथून नवीन Redmi स्मार्ट टीव्हीची काही माहिती मिळाली आहे. या वेबपेजनुसार, नवीन Redmi TV मध्ये 20W स्पिकर, डॉल्बी ऑडियो सपोर्ट, DTS Virtual: X सपोर्ट दिला जाऊ शकतो.
Redmi TV
Redmi स्मार्ट टीव्ही इतक्या कमी बजेटमध्ये उपलब्ध होणारा पहिला स्मार्ट टीव्ही असेल, असा दावा कंपनीने केला आहे. परंतु या डिवाइसच्या किंमतीची माहिती मात्र उपलब्ध झाली नाही. ज्या पद्धतीने कंपनीने दावा केला आहे त्यानुसार हा एक बजेट फ्रेंडली स्मार्ट टीव्ही असू शकतो.
आगामी Redmi TV मध्ये Android 11 ऑपरेटिंग सिस्टम दिली जाऊ शकतो. जो कंपनीच्या PatchWall Redmi TV ऑपरेटिंग सिस्टमसह येईल. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल बॅंड वायफाय, ब्लूटूथ 5.0, ऑटो लो लेटेंसी मोड आणि इतर अनेक फिचर मिळतील. हा नवीन स्मार्ट टीव्ही जास्त कलरफुल, ब्राईट, क्रिस्पर इमेज क्वालिटीसह बाजारात येईल, असे कंपनीने म्हटले आहे.