सारखे सारखे कर्ज हवेय का? सोने तारण ठेवायचेय का? क्रेडिट कार्ड हवेय का असे फोन घेऊन वैतागलेल्या लोकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे फ्रॉड कॉलपासूनही सुटका होणार आहे. केंद्र सरकारने नवे सिमकार्ड नियम लागू केले आहेत. यानुसार असे फोन नंबर्स दोन वर्षांसाठी ब्लॉक केले जाणार आहेत.
फ्रॉड आणि स्पॅम कॉलवर लगाम कसण्यासाठी केंद्र सरकारने ट्रायला निर्देश दिले होते. यानंतर ट्रायने २३ फेब्रुवारीला बैठक घेतली होती. या बैठकीत काही नियम बनविण्यात आले होते. यानुसार एखादा सिम कार्ड धारक त्याच्या पर्सनल कार्डचा वापर प्रमोशन आणि स्पॅम कॉलसाठी वापरत असेल तर त्याचा मोबाईल नंबर २ वर्षांसाठी ब्लॉक केला जाणार आहे. याचबरोबर त्या पत्त्यावर दुसरे कोणतेही सिमकार्ड नव्याने जारी केले जाणार नाही.
नवे नंबर येणार...प्रमोशन कॉल्ससाठी TRAI ने नवीन 10 अंकी मोबाइल नंबर जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे लोक हे नंबर दिसताच आधीच ओळखतील आणि उचलायचा की नाही ते ठरवतील. यासाठी मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने स्पॅम आणि फसवणूक कॉलला आळा घालण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ट्रायने कंपन्यांना ७ वेगवेगळ्या कॅटेगरींमध्ये १० अंकी नंबर देण्यास सांगितले आहे. यानुसार प्रमोशनचे कॉल कोणते आणि स्पॅम कॉल कोणते हे कंपन्यांना ओळखता येणार आहेत. यानंतर स्पॅम कॉल ब्लॉक केले जाणार आहेत. याचसोबत डीएनडीला देखील आणखी चांगल्याप्रकारे काम करण्यासाठी अपडेट करण्यात येणार आहे.
या असणार त्या कॅटेगरी...
- बँकिंग/विमा/आर्थिक उत्पादने/क्रेडिट कार्ड
- शिक्षण
- आरोग्य
- ग्राहकोपयोगी वस्तू आणि वाहन
- संप्रेषण/प्रसारण/मनोरंजन/IT
- पर्यंटन
कंपन्यांचा असेल एक कॉमन प्लॅटफॉर्मया सेवेसाठी कंपन्यांना कॉमन प्लॅटफॉर्म वापरावा लागणार आहे. देशातील विविध टेलिकॉम नेटवर्कमुळे, हे प्लॅटफॉर्म सर्व नेटवर्कवरील नको असलेले किंवा स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्यात मदत करेल. कंपन्यांना या प्लॅटफॉर्मवर ब्लॉक केलेल्या नंबरची माहिती द्यावी लागेल, जे लोकांना स्पॅम किंवा नको असलेले कॉल करतात. ही कारवाई पूर्ण करण्यासाठी कंपन्यांना १ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. १ मे नंतर अशा नंबरवरून येणारे कॉल्स फक्त नेटवर्कवर ब्लॉक करावे लागतील.