Realme नं आपला आक्रमक पवित्रा सोडलेला नाही, कंपनी एकामागून एक हँडसेट सादर करत आहे. काही दिवसांपूर्वी भारतात 150W फास्ट चार्जिंग असलेला Realme GT Neo 3 स्मार्टफोन आला होता. तसेच GT सीरिजमध्ये देखील काही प्रीमियम स्मार्टफोन सादर करण्यात आले आहे. आता लवकरच भारतात Realme Narzo 50 5G Series चा विस्तार केला जाऊ शकतो.
Realme Narzo 50 5G Series
रियलमीनं एक ट्विट करून Realme Narzo 50 5G Series मध्ये नवीन मॉडेल येणार असल्याचं सांगितलं आहे. हा डिवाइस जास्त पावरसह सादर करण्यात येईल. त्यामुळे Unisoc किंवा MediaTek Helio चिपसेटच्या ऐवजी MediaTek Dimensity प्रोसेसरचा वापर करण्यात येईल. Narzo 50 सीरिजमध्ये सध्या Narzo 50, Narzo 50i, Narzo 50A आणि Narzo 50A Prime उपलब्ध आहेत.
Realme Narzo 50 5G चे लीक डिजाईन आणि स्पेक्स
91Mobiles नं याआधी Realme Narzo 50 5G चे रेंडर शेयर केले आहेत. या रेंडर्समधून स्मार्टफोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. आगामी रियलमी फोनच्या मागे स्ट्रिप पॅटर्न आणि ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. मोठ्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये दोन एलईडी फ्लॅश देखील मिळतील. तसेच खालच्या बाजूला Narzo ब्रॅंडिंग मिळेल.
लीक्सनुसार, Realme Narzo 50 5G मध्ये 6.58-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळेल. जो 90Hz रिफ्रेश रेटसह बाजारात येईल. या फोनमध्ये MediaTek Dimensity 810 चिपसेट असू शकतो, सोबत 6GB RAM आणि 128GB स्टोरेज दिली जाऊ शकते. ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये 13MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी सेन्सर मिळेल. फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा असेल. या डिवाइसमध्ये 4800mAh बॅटरी मिळू शकते, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.