शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

लवकरच येणार वन प्लस ५टी स्मार्टफोनचे नवीन व्हेरियंट

By शेखर पाटील | Published: December 29, 2017 10:56 AM

वन प्लस कंपनीने आपल्या वन प्लस ५टी या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनला नवीन व्हेरियंटच्या स्वरूपात सादर करण्याचे संकेत दिले आहेत.

भारतीय बाजारपेठेत वन प्लस ५टी हे मॉडेल ६ व ८ जीबी रॅमच्या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. मध्यंतरी या मॉडेलची स्टार वॉर्स लिमिटेड एडिशन या नावाने नवीन आवृत्ती ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. यात आता सॉफ्ट गोल्ड या आकर्षक रंगातील नवीन आवृत्तीची भर पडण्याची शक्यता आहे. याचे विविध लीक्स समोर आले आहेत. नावातच नमूद असल्यानुसार हा स्मार्टफोन सॉफ्ट गोल्ड या आकर्षक रंगाच्या पर्यायात ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे. अर्थात ब्लॅक, लाव्हा रेड आणि स्टार वॉर्स लिमिटेड एडिशननंतर ही वन प्लस ५टी या मॉडेलची चौथी आवृत्ती असणारा आहे. 

रंगाचा अपवाद वगळता वन प्लस ५टी मॉडेलमधील सर्व फिचर्स आधीप्रमाणेच राहण्याची शक्यता आहे. अर्थात यात ६.०१ इंच आकारमानाचा आणि १०८० बाय १९२० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा व १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा २.५डी फुल ऑप्टीक डिस्प्ले असेल. यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर असेल. याचे ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट आहेत. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. यातील एक कॅमेरा एफ/१.७ अपार्चरसह १६ मेगापिक्सल्स सोनी आयएमक्स३९८ सेन्सरयुक्त असेल. तर दुसरा कॅमेरा एफ/१.७ अपार्चरसह २० मेगापिक्सल्स सोनी आयएमएक्स३७६के सेन्सरयुक्त देण्यात आला आहे. तर यात १६ मेगापिक्सल्सचा सोनी आयएमएक्स३७१ सेन्सरयुक्त फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या ऑक्सीजन ओएस ४.७.० या प्रणालीवर चालणारा आहे. यात फेस अनलॉक हे विशेष फिचर देण्यात आले आहे.  वनप्लस ५ टी या स्मार्टफोनमध्ये कंपनीच्या डॅशचार्ज हा फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सज्ज असणारी ३,३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानOneplus mobileवनप्लस मोबाईल