लेनोव्होची मालकी असणार्या मोटोरोलाने भारतीय बाजारपेठेत आधीच आपला मोटो एक्स ४ हा स्मार्टफोन ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध केलेला आहे. यात आता ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज असणार्या नवीन आवृत्तीची भर पडली आहे. तसेच आधीची आवृत्ती ही अँड्रॉइड नोगटवर चालणारी होती. तर नवीन आवृत्ती अँड्रॉइड ओरिओ या आवृत्तीवर चालणारी आहे. हा फरक वगळता मोटो एक्स ४ या मॉडेलमधील अन्य फिचर्स हे मूळ आवृत्तीनुसारच आहेत. अर्थात यात ५.२ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी (१०८० बाय १०२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याच्या पुढील आणि मागील बाजूस कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण देण्यात आले आहे. यात क्वॉलकॉमचा अतिशय गतीमान असा स्नॅपड्रॅगन ६३० प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. तर यासोबत यात अड्रेनो ५०८ ग्राफीक प्रोसेसरही दिलेला आहे. याच्या मदतीने या स्मार्टफोनवर उच्च ग्राफीक्सयुक्त गेमिंगचा आनंद घेता येणार आहे. वर नमूद केल्यानुसार यातील इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.
मोटो एक्स ४ या मॉडेलच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याच्या अंतर्गत फेज डिटेक्शन ऑटो-फोकस आणि ड्युअल टोन एलईडी फ्लॅशयुक्त १२ आणि ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक कॅमेरा आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील आहे. याच्या मदतीने अतिशय दर्जेदार छायाचित्रे घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात एलईडी फ्लॅशयुक्त १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यात टर्बोचार्ज हा तंत्रज्ञानाने युक्त असणारी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. तर यात फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्टसह कनेक्टीव्हिटीचे अन्य पर्याय दिलेले आहेत. याची डिझाईन ग्लास सँडविच या प्रकारातील असून हे मॉडेल वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ आहे. मोटो एक्स ४ या स्मार्टफोनचे मूल्य २४,९९९ रूपये असून हे मॉडेल ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलसह मोटो हब स्टोअर्समधून खरेदी करता येणार आहे.