शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

विवो व्ही ७ प्लसची नवीन आवृत्ती

By शेखर पाटील | Published: November 09, 2017 11:22 PM

विवो कंपनीने आपल्या विवो व्ही ७ प्लस या स्मार्टफोनची ‘एनर्जेटिक ब्ल्यू’ या रंगातील नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

विवो कंपनीने आपल्या विवो व्ही ७ प्लस या स्मार्टफोनची ‘एनर्जेटिक ब्ल्यू’ या रंगातील नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे. विवो व्ही ७ प्लस हा स्मार्टफोन ७ सप्टेंबर रोजी भारतीय बाजारपेठेत गोल्ड, रोझ गोल्ड आणि मॅट ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला होता. यात आता ‘एनर्जेटीक ब्ल्यू’ या रंगाची भर पडली आहे. याचे मूल्यदेखील मूळ व्हेरियंटप्रमाणेच अर्थात २१,९९० रूपये असून हा स्मार्टफोन ‘अमेझॉन इंडिया’वरून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे.विवो व्ही ७ प्लस या मॉडेलमध्ये ५.९९ इंच आकारमानाचा आणि एचडी (१४४० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा २.५ डी आयपीएस इनसेल फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले असू यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण देण्यात आले आहे. विवो व्ही ७ प्लस  हा स्मार्टफोन ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४५० या प्रोसेसरने सज्ज असेल. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते २५६ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. विवो व्ही ७ प्लस या मॉडेलमध्ये तब्बल २४ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. हा कॅमेरा एफ/२.० अपार्चरयुक्त असून याला मूनलाईट ग्लो या प्रकारच्या सेल्फी फ्लॅशची सुविधा असेल. अर्थात याच्या मदतीने अतिशय उत्तम सेल्फी घेता येणार असल्याचा विवो कंपनीचा दावा आहे. तर याच्या मागील बाजूस एफ/२.० अपार्चर आणि ड्युअल एलईडी फ्लॅशयुक्त १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा आहे.विवो व्ही ७ प्लस हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर आधारित असलेल्या फनटच ओएस ३.२वर चालणारा असेल. तर यातील बॅटरी ३२२५ मिलीअँपिअर क्षमतेची आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट, डिजीटल कंपास आदी सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.  

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान