नवी दिल्ली - WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. युजर्सचं चॅट अधिक मजेशीर करण्यासाठी WhatsApp सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. मात्र आता WhatsApp वर एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. युजर्सना एका WhatsApp Bug चा सामना करावा लागत आहे. या Bug मुळे रिप्लाय सेक्शनमध्ये चुकीचे मेसेज पाठवले जात आहेत.
WhatsApp संबंधी माहिती देणाऱ्या WABetaInfo या वेबसाईटने या नव्या Bug ची ट्वीटरवरून माहिती दिली आहे. तसेच यासंबंधी एक स्क्रिनशॉटही शेअर केला आहे. WhatsApp बीटाच्या अॅन्ड्रॉईड व्हर्जन 2.19.27 मध्ये हा Bug सापडला आहे. ग्रुप चॅट दरम्यान या Bug ची माहिती मिळाली.
युजर्सने दिलेल्या माहितीनुसार, WhatsApp Bug मुळे रिप्लाय सेक्शनमध्ये कोणताही चुकीचा मेसेज अचानक पाठवला जात आहे. ग्रुप चॅट ओपन केल्यानंतर स्वाईपच्या माध्यमातून मेसेजला रिप्लाय केल्यानंतर असं होत असल्याचं समोर आलं आहे. रिप्लाय दिल्यानंतर ग्रुपमधून बाहेर पडून पुन्हा एकदा मेसेजला रिप्लाय केल्यास त्यावेळी तो चुकीचा मेसेज दिसतो. सध्या ही समस्या WhatsApp च्या बीटा व्हर्जनमध्ये आहे.
सावधान! WhatsApp Bug मुळे जुने मेसेज गायब; असा करा बचाव
WhatsApp वर याआधी काही दिवसांपूर्वी जुने चॅट अचानक गायब होत असल्याची तक्रार अनेक युजर्सनी केली होती. WhatsApp वर आलेल्या एका Bug मुळे असं झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. जगभरातील अनेक युजर्सना चॅट अचानक गायब झाल्याचा अनुभव आल्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर याबाबत तक्रार केली होती. मात्र WhatsApp कडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.