नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिसर्च आणत असतं. यावेळी ही व्हॉट्सअॅप अशी काही नवीन फिचर्स आणले आहेत त्याबाबत जाणून घेऊया.
स्वाइप टू रिप्लाय
स्वाइप टू रिप्लाय हे फिचर याआधी आयफोनसाठी देण्यात आलं होतं. मात्र आता अॅन्ड्रॉइडसाठीही ते लवकरच उपलब्ध होणार आहे. या फिचरच्या मदतीने कोणालाही पटकन रिप्लाय देता येणार आहे. आलेल्या मेसेजला केवळ स्वाइप करुन संबंधित व्यक्तीला रिप्लाय देता येईल.
डार्क मोड
व्हॉट्सअॅपने युजर्सच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी एक खास फिचर आणले आहे. ‘डार्क मोड’ असं या फिचरचं नाव असून यामुळे यूजर्सच्या डोळ्यांवरील ताण कमी होणार आहे. तसेच रात्रीच्या वेळी कमी प्रकाशातही डोळ्यांवर ताण न देता व्हॉट्सअॅपचा वापर या फिचरमुळे करता येणार आहे.
प्रीव्हयू मीडिया फ्रॉम नोटीफिकेशन
व्हॉट्सअॅपचे बीटा युजर्स हे प्रीव्हयू मीडिया फ्रॉम नोटीफिकेशनचा वापर करत आहेत. या फिचरमुळे ग्रुपमध्ये शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ याबाबतच्या सर्व सूचना पाहणं लगेच शक्य होणार आहे. त्यासाठी पुन्हा संपूर्ण चॅट ओपन करण्याची गरज नाही.
एक्सपान्डेबल ग्रुप इन्फो
व्हॉट्सअॅप नेहमीच ग्रुप अॅडमीनला वेगवेगळे अधिकार हे फिसर्चच्या माध्यमातून देत असतं. व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जन असलेल्या युजर्ससाठी ग्रुप इन्फोरमेशनमध्ये एका नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार ग्रुपमधील 10 सदस्यांचा यादी दिसते. तुम्हाला जर संपूर्ण यादी पाहायची असेल तर तुम्ही नव्या पर्यायाचा वापर करू शकता.