कॅलिफोर्निया : स्मार्टफोन बनविणारी जगप्रसिद्ध कंपनी अॅपलने 11 व्या पिढीचे तीन आयफोन लाँच केले आहेत. याचबरोबर नवीन गेमिंग सर्व्हिस अॅपल ऑर्केड, ५ व्या पिढीचे अॅपल वॉच आणि ७ व्या पिढीचे 10.2 इंचाचा आयपॅडही लाँच केला आहे.
नेक्स्ट जनरेशन अॅपल वॉचच्या 5 व्या सिरीजमध्ये कायम सुरू राहणारा नवीन डिस्प्ले देण्यात आला आहे. म्हणजेच युजर वेळ आणि नोटिफिकेशन सारखे पाहू शकणार आहे. हे वॉच 100 टक्के रिसायकल केलेल्या अॅल्यूमिनिअमपासून बनविण्यात आले आहे. या वॉचद्वारे ईसीजीही काढता येणार आहे. याशिवाय हार्ट रेट मॉनिटरही करता येणार आहे.
वेळ दाखविण्यासोबत फोन कॉल, सॅटेलाईट कम्युनिकेशन्स, वॉयर रेझिस्टेंससारखे फिचर मिळणार आहेत. यामध्ये कंपनीने LTPO तंत्रज्ञानाचा आणि कमी वीज वापरणाऱ्या डिस्प्ले ड्रायव्हरचा वापर केला आहे. यामुळे या वॉचची बॅटरी 18 तास चालणार आहे.
वॉचमध्ये होकायंत्रही देण्यात आले आहे. सुरक्षेसाठी SOS फीचर देण्यात आले आहे. आपत्कालीन काळात वॉचचे बटन दाबल्यानंतर कॉलही करता येणार आहे. यामध्ये सिरॅमिक व्हाईट, ब्लॅक बँड, आणि स्पोर्टस बँड मिळणार आहेत. सोबतच अॅपल पे, स्विम प्रूफ अशी सुविधाही मिळणार आहे.