Apple चा iPhone विकत घेण्याचा स्वस्त पर्याय म्हणजे iPhone चा स्पेशल एडिशन व्हर्जन. एका नवीन रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि 2022 मध्ये Apple iPhone SE चा नवीन मॉडेल लाँच केला जाऊ शकतो. हा स्वस्त मॉडेल कंपनी 5G सपोर्टसह सादर करू शकते. हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन असेल, अशी चर्चा आहे.
अॅप्पल विश्लेषक Ming-Chi Kuo यांनी खुलासा केला आहे कि आगामी iPhone SE 2022 च्या पहिल्या सहामाहीत लौंच केला जाऊ शकतो. Kuo यांनी सांगितले कि, 2022 iPhone SE च्या डिजाईनमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत. SE सीरीज कंपनीची स्वस्त स्मार्टफोन सीरिज आहे त्यामुळे iPhone SE 3 फोन अॅप्पलचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन ठरू शकतो. परंतु याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
iPhone SE 3 ची आतापर्यंत आलेली माहिती
Apple iPhone SE 3 मध्ये 4.7 इंचाचा LCD डिस्प्ले दिली जाऊ शकतो. ज्या लोकांना कॉम्पॅक्ट स्मार्टफोन्स आवडतात त्यांच्यासाठी हा योग्य पर्याय ठरू शकतो. iPhone SE 3 मध्ये कंपनी 5G सपोर्ट देऊ शकते. अॅप्पल iPhone SE 3 चा नवीन व्हेरिएंट देखील लाँच केला जाऊ शकतो, असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. या नवीन मॉडेलमध्ये 6.1 इंचाचा मोठा डिस्प्ले असेल.