लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगभरात माेठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या साेशल मेसेजिंग ॲप व्हाॅट्सॲपमध्ये एक नवे फिचर जाेडण्यात आले आहे. दरराेज येणाऱ्या शेकडाे मेसेजमधून महत्त्वाचा मेसेज शाेधताना नाकीनऊ येतात. असे मेसेज शाेधण्यासाठी व्हाॅट्सॲपने ‘चॅट फिल्टर’ हे फिचर सादर केले आहे. याचा वेब वापरकर्त्यांना जास्त फायदा हाेऊ शकताे. व्हाॅट्सॲप बीटा इन्फाेने यासंदर्भात माहिती दिली आहे.
फायदा काय? अनेकदा असे हाेते की, काही मेसेज वाचले जात नाहीत. अशा एखादा महत्त्वाचा मेसेज सुटला तर वापरकर्त्यांना मनस्ताप हाेताे. त्यामुळे नवे फिचर सर्वांनाच उपयुक्त ठरेल. काही दिवसांनी नवे फिचर राेलआऊट हाेऊ शकते.
काय आहे हे नवे फिचर?nअनरिड, काॅन्टॅक्ट्स आणि ग्रुप्स असे तीन फिल्टर मिळतील.nत्यातून हवा असलेला पर्याय निवडल्यास महत्त्वाचे मेसेज पाहू शकतील. nअनरीड फिल्टरमध्ये असे मेसेज दिसतील, जे वाचलेले नाहीत.nकाॅन्टॅक्ट फिल्टरमध्ये तुमच्या फाेनबुकमध्ये सेव्ह केलेल्या लाेकांनी पाठविलेले मेसेज दिसतील.nग्रुप्स फिल्टर निवडल्यास तुम्ही ज्या ग्रुप्समध्ये आहात, त्या ग्रुपची यादी समाेर येईल.