Whatsapp नं काही वर्षांपूर्वी Status हे फीचर लाँच केलं होतं. Whatsapp स्टेटसद्वारे युझर्सला फोटो, व्हिडीओ आणि टेक्स्ट शेअर करण्याची सुविधा मिळतं. परंतु हे स्टेटस २४ तासांपुरतंच ठेवता येतं. हे फीचर इन्स्टाग्राम आणि फेसबुक स्टोरीजद्वारे प्रेरित असलं तरी हे सर्वाधिक लोकप्रिय ठरलं आहे.
अनेकदा आपल्याला आपल्या मित्राचं स्टेटस आवडतं. परंतु ते आपल्याला कॉपी करता येत नाही. त्यामुळे आपण त्याचा स्क्रीनशॉट काढून सेव्ह करतो. परंतु व्हिडीओ स्टेटसच्या बाबतीत हे शक्य नाही. अशातच आपण अशी एक ट्रिक पाहू ज्या माध्यमातून तुम्ही Whatsapp चं स्टेटसही डाऊनलोड करू शकता. परंतु ते स्टेटस डाऊनलोड करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घ्या असा सल्ला आम्ही देतो.
असं करा स्टेटस डाऊनलोडही ट्रिक केवळ अँड्रॉईड़ फोनसाठीच कामी येणार आहे. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Google Files डाऊनलोड करा. त्यानंतर ते ओपन करून डाव्याबाजूला असलेल्या Menu वर क्लिक करा. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या सेटिंग्स ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर या ठिकाणी असलेल्या show hidden files ऑप्शनवर टॅप करा. तसंच आपलं फाईल मॅनेजर ओपन करून इंटरनल स्टोरेजमध्ये जा. त्या ठिकाणी असलेल्या Media आणि त्यानंतर Status हा फोल्डर ओपन करा. त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही पाहिलेले सर्व फोटो आणि व्हिडीओस मिळतील. त्यानंतर जे व्हिडीओ फोटो डाऊनलोड करू इच्छीत असाल तर लाँग प्रेस करा आणि ते डाऊनलोड करून सेव्ह करा.