नवी दिल्ली : स्मार्ट टीव्हीच्या (Smart TV) आगमनानंतरही बरेच लोक अजूनही केबल आणि सेट टॉप बॉक्सच्या मदतीने टीव्ही शो आणि चित्रपटांचा आनंद घेत आहेत. पण ओटीटीपासून (OTT) त्यांचा व्यवसाय खूपच मंदावला आहे. आता युट्युब (Youtube) देखील एक नवीन सेवा आणत आहे, ज्यामुळे लोकांना चित्रपट आणि शो विनामूल्य पाहता येतील. यासाठी लोकांना केबल किंवा सेट टॉप बॉक्स रिचार्ज करण्याची गरज नाही. सर्व काम विनामूल्य केले जाईल.
Techcrunch च्या रिपोर्टनुसार, यूट्यूब नवीन सेवेची चाचणी करत आहे. ज्याद्वारे लोक टीव्ही शो आणि चित्रपट विनामूल्य पाहू शकतील. YouTube अधिकृतपणे एक चाचणी चालवत आहे, जी अमेरिकेतील काही युजर्सना व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर समर्पित हबद्वारे विनामूल्य अॅड सपोर्टेड फास्ट चॅनेल पाहण्याची परवानगी देते, ज्या युजर्सजवळ अॅक्सेस आहे. त्यांना फास्ट लीनिअर चॅनेल मिळतील. जिथे ते विनामूल्य चित्रपट आणि टीव्ही चॅनेल पाहू शकतील. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आम्ही नेहमीच नवीन मार्ग शोधत असतो. YouTube एक अशी जागा आहे, जिथे लोक काहीही मिळवू आणि शोधू शकतात."
आता तुम्ही विचार करत असाल की YouTube लोकांना टीव्ही शो आणि चित्रपट विनामूल्य का दाखवेल. यातून त्याला काय मिळणार? दरम्यान, चित्रपट किंवा शो दाखवत असताना YouTube जाहिराती दाखवेल. ते कमाईचे मोठे साधन असणार आहे. याद्वारे मोठी कमाई होण्याची अपेक्षा आहे.
याचबरोबर, कोणत्या शोला सर्वाधिक पसंती दिली जात आहे, हे या शोजना कळू शकेल. यावरून कळेल की लोकांना कोणती गोष्ट जास्त आवडते. YouTube ने अलीकडे लोकांना अशी सुविधा दिली आहे की, ते 4k व्हिडिओ देखील स्ट्रीम करू शकतात. आता झूम करूनही व्हिडिओ पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्ने + हॉटस्टार यांसारख्या अॅप्समधून यूट्यूबला खूप कॉम्पिटिशन मिळत होते.