नवी दिल्ली - विविध वेबसाइट्सवर लॉगइन करण्यासाठी आता युझर्सना आयफोन प्रमाणेच फेसआयडी ऑथेंटिकेशनचा वापर करता येणार आहे. एका नव्या माहितीनुसार काही काळानंतर युझर्स पासवर्ड टाइप न करताच आपल्या अकाऊंटमध्ये लॉग इन करू शकणार आहेत. Fido Alliance आणि W3C कडून लॉन्च करण्यात आलेले नवे वेब ऑथेंटिकेशन स्टँडर्ड इन्क्रिप्टेड आहे आणि ही प्रणाली पासवर्डसोबतच फिंगरप्रिंट सेंन्सर्स, कॅमेरा आणि यूएबी बटण यांसारख्या सिक्युरिटी सिस्टीमची जागा घेऊ शकते. या संदर्भात माहिती देताना W3C website ने सांगितले की, हे स्पेसिफिकेशन, एपीआय क्षमता असलेल्या तंत्रज्ञानाला समोर आणते आणि तसेच त्यामुळे ऑथेंचिकेटेड युझर्ससाठी भक्कम, अटेस्टेड आणि पब्लिक की आधारित वेब अॅप्लिकेशन वापर शक्य होणार आहे. मोझीला फायरफॉक्स ही या तंत्रज्ञानाचा वापर करणारी पहिली कंपनी आहे. तर गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एज सध्या ही सिस्टीम वापरात आणण्यावर काम करत आहेत. आता येत्या काही महिन्यांमध्ये या ब्राऊझर्सवरही ही प्रणाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ओपेरा ब्राऊझर्सवरही नव्या लॉगिनला सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. मात्र अॅपलच्या सफारीवर नव्या वेब ऑथेंटिकेशन लॉगिन प्रक्रिया येण्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. कोणताही युझर फोनवर एक वेबसाइटमध्ये आधीपासून लॉगइन असेल तर त्याला 'register this device with example.com?' असा मेसेज येईल. त्याला सहमती दर्शवल्यावर फोन युझर्सच्या आधी कॉन्फिगर झालेल्या पीन आणि बायोमेट्रिक संकेतांकांबाबत विचारणा करेल. त्यानंतर एकदा ऑथराइज्ड झाल्यावर ही वेबसाइट रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याचा मेसेज पाठवेल. डेस्कटॉपवरसुद्धा वेबसाइट युजर्स आपल्या हँडसेटवर पूर्ण करण्यात आलेल्या स्टेप्सवर परफॉर्म करण्यास सांगेल.
आता पासवर्ड नाही तुमचा चेहरा पाहून लॉगइन होईल तुमचे अकाऊंट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 5:32 PM