शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

WhatsAppवर व्हायरल होतेय 'The Kashmir Files' चित्रपटाची बनावट लिंक; पोलिसांनी जारी केला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 3:48 PM

'द काश्मिर फाइल्स' हा सध्या भारतातील लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चेचा चित्रपट बनला आहे. 1990 च्या दशकात काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित या चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

'द काश्मिर फाइल्स' हा सध्या भारतातील लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चेचा चित्रपट बनला आहे. 1990 च्या दशकात काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित या चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. यासोबतच सायबर गुन्हेगारही याचा फायदा घेत आहेत. सध्या व्हॉट्सअॅपवर काश्मीर फाइल्सची डाउनलोड लिंक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जे वापरकर्त्यांना चित्रपट विनामूल्य डाउनलोड करण्यास प्रवृत्त करत आहे. नोएडा पोलिसांचे अतिरिक्त उपायुक्त रणविजय सिंह यांनी व्हॉट्सअॅपवर या फसवणुकीबाबत मोबाईल वापरकर्त्यांना अलर्ट जारी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द काश्मीर फाइल्स चित्रपट डाउनलोड करण्यासाठी बनावट लिंक्स व्हायरल करुन त्यातून फसवणुकीचा डाव सायबर गुन्हेगार रचत आहेत. 

सोशल मीडिया आणि द काश्मीर फाइल्सवर 'फ्री अॅक्सेस' देणार्‍या व्हॉट्सअॅप लिंकवर क्लिक करण्यापासून पोलिसांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. नोएडाचे अतिरिक्त उपायुक्त रणविजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅपवर मालवेअरवर लिंकवर क्लिक केल्याने फोन हॅक होऊ शकतात आणि नंबरशी लिंक असलेली बँक खाती रिकामी होऊ शकतात. पोलिसांनी फसवणुकीशी संबंधित काही तक्रारी नोंदवल्या आहेत, ज्यामध्ये वापरकर्त्यांनी चित्रपटाच्या काही डाउनलोड लिंकवर क्लिक केले, परंतु त्यांनी या लिंक्स उघडताच, हॅकर्सना उघडपणे वापरकर्त्यांच्या फोन तपशीलांचा अॅक्सेस मिळाला आणि बँक खाते क्रमांकांसारखे खाजगी तपशील चोरण्यात त्यांना यश आलं. 

काश्मीर फाइल्सवरून व्हॉट्सअॅपवर फसवणूक“हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअॅपवर चित्रपट मोफत डाउनलोड करण्यासाठी लिंक पाठवण्यास सुरुवात केली आहे. एकदा वापरकर्त्याने लिंकवर क्लिक केल्यानंतर, ते हॅकर्सना वापरकर्त्यांच्या फोनवरील माहितीमध्ये प्रवेश करण्यास परवानगी देतात आणि बँक खात्याच्या माहितीसह खाजगी तपशील सहजपणे चोरतात", असं सिंग यांनी म्हटलं आहे.

हॅकर्सच्या अनेक बनावट लिंक्स तयार झाल्या आहेत ज्या आता व्हॉट्सअॅपवर फिरत आहेत. लिंकमध्ये, काश्मीर फाइल्स चित्रपट हाय क्वालिटी आणि विनामूल्य डाउनलोड करण्यास सांगितले जात आहे. वापरकर्त्यांनी त्यांच्या फोनच्या ब्राउझरची लिंक उघडताच हॅकर्स फोनमधील मालवेअर सक्रिय करतात. मिळालेल्या माहितीनुसार, २४ तासांच्या आत किमान तीन युजर्सनी केवळ एका पोलिस ठाण्यात सायबर फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांचे एकूण 30 लाखांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपThe Kashmir Filesद काश्मीर फाइल्स