Noise नं भारतात नवीन AirBuds Pro लाँच केले आहेत. हे TWS EarBuds सर्वात नॉइज कॅन्सलेशनसह सादर करण्यात आले आहेत. ज्यात ट्रान्स्परन्सी मोड, हायपर सिंक टेक्नॉलॉजी आणि इतर अनेक फिचर मिळतात. हे इयरबड्स क्वॉड माईक, IPX5 रेटिंग आणि 10mm ड्रायव्हरसह बाजारात आले आहेत. Noise AirBuds Pro एकूण 20 तासांपर्यंतचा प्लेबॅक टाइम देतात.
Noise AirBuds Pro ची किंमत
Noise AirBuds Pro ची किंमत 2499 रुपये ठेवण्यात आली आहे. हे इयरबड्स कंपनीच्या अधिकृत वेबसाईट, अॅमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट अशा ई-कॉर्मस प्लॅटफॉर्म्ससह ऑफलाईन देखील खरेदीसाठी उपलब्ध होतील. Noise AirBuds Pro ब्लॅक, व्हाइट आणि ब्लू अशा रंगात सादर करण्यात आले आहेत.
Noise AirBuds Pro चे स्पेसिफिकेशन्स
Noise AirBuds Pro मध्ये 10mm ड्रायव्हरचा वापर करण्यात आला आहे. हे बड्स आजूबाजूचा अॅक्टिव्ह नॉइज -25 dB पर्यंत कॅन्सल करू शकतात. 3000 रुपयांच्या आत येणाऱ्या इयरबड्समध ANC हे फिचर खूप दुर्मिळ आहे. यातील Hyper SyncTM टेक्नॉलॉजी इयरबड्स स्मार्टफोनशी तत्काळ कनेक्ट करण्यास मदत करते.
इयरबड्समध चार माईक, 10mm स्पिकर ड्रायव्हर आणि ट्रान्स्परन्सी मोड मिळून कॉलिंगचा चांगला अनुभव देतात. AirBuds Pro स्टेम डिजाइनसह सादर करण्यात आले आहेत. यातील फिचर टच कंट्रोलच्या मदतीने नियंत्रित करता येतात. यात लेटेस्ट ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. यातील IPX5 रेटिंग या बड्सना वॉटर आणि स्वेट रेजिस्टन्स देते.