भारतीय ऑडिओ ब्रँड नॉइजने आपले नवीन ट्रू वायल्स इयरबड्स भारतात सादर केले आहेत. हे बड्स Noise Buds VS303 या नावाने ग्राहकांच्या भेटीला आले आहेत. हे इयरबड्स कंपनीच्या हायपर सिंक टेक्नॉलॉजीसह सादर करण्यात आले आहेत. ही टेक्नॉलॉजी सुस्पष्ट आवाज आणि संगीत देण्यास मदत करते. यात व्हॉइस असिस्टंट सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
नॉइज बड्स VS303 ची किंमत 1,799 रुपये ठेवण्यात आली आहे. बड्स काळ्या आणि निळ्या रंगात विकत घेता येतील. यांची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर सुरु आहे. हे ट्रू वायरलेस इयरबड्स ब्लूटूथ 5.0 चा वापर करून अँड्रॉइड आणि आयओएस अश्या दोन्ही डिव्हाइसेस सोबत वापरता येतात.
Noise Buds VS303 मध्ये 13mm च्या ड्रायव्हरचा वापर कंपनीने केला आहे. हे ट्रू वायरलेस इयरबड्स कंपनीने अर्गोनॉमिक डिजाईनसह सादर केले आहेत. म्युजिक प्ले-पॉज करण्यासाठी तसेच आवाज कमी जास्त करण्यासाठी यात टच कंट्रोल देण्यात आले आहेत. स्मार्टफोन पासून 10 मीटरच्या अंतरावर देखील हे बड्स कनेक्टड राहतील. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाईप सी सपोर्ट देण्यात आला आहे. सिंगल चार्जमध्ये हे बड्स 6 तासांचा प्लेबॅक टाइम देऊ शकतात. चार्जिंग केससह हा प्ले बॅक टाइम 24 तासांवर नेता येतो. Noise Buds VS303 पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 1.5 तासांचा वेळ लागतो.