HMD Global कडे Nokia ब्रँडचे हक्क आहेत. या कंपनीने आता Nokia 110 4G आणि Nokia 105 4G नावाचे दोन नवीन फिचर फोन लाँच केले आहेत. या दोन्ही फिचर फोन्सची खासियत म्हणजे हे 4G सपोर्टसह सादर करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया या दोन्ही फोन्सची संपूर्ण माहिती.
Nokia 110 4G, Nokia 105 4G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
नोकिया 110 4G आणि नोकिया 105 4G या दोन्ही फीचर फोनमध्ये 1.8-इंचाचा QQVGA कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही फोन सिरीज 30+ ओएसवर चालतात. दोन्ही फोनमध्ये झूम-इन मेनू, रीडआउट असे फीचर देण्यात आले आहेत. रीडआऊट फिचरच्या मदतीने फोनवर आलेला टेक्स्ट ऐकता येतो.
या दोन्ही फोन्समध्ये Unisoc T107 चिपसेट देण्यात आला आहे. हे फोन्स 128MB रॅम आणि 48MB स्टोरेजसह सादर करण्यात आले आहेत. हि स्टोरेज 32GB पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड वापरून वाढवता येते. Nokia 110 4G आणि Nokia 105 4G मध्ये 18 तासांचा बॅकअप देणारी 1,020mAh ची बॅटरी मिळते. नोकिया 100 4G च्या मागे एक कॅमेरा देखील मिळतो.
Nokia 110 4G आणि Nokia 105 4G ची किंमत
Nokia 110 4G कंपनीने 39.90 युरो (अंदाजे 3,600 रुपये) मध्ये लाँच केला आहे. तर, Nokia 105 4G स्मार्टफोन कंपनीने 34.90 युरो (अंदाजे 3,100 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे.