शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

4000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत Nokia 225 4G Feature Phone लाँच; देणार का JioPhone ला आव्हान 

By सिद्धेश जाधव | Published: October 22, 2021 5:04 PM

Nokia 4G Feature Phone India Price Specification: Nokia 225 4G Payment Edition मधील वन-की पेमेंट अ‍ॅक्शन या फोनची खासियत आहे. त्यामुळे पेमेंट करताना किचकट स्टेप्स कराव्या लागत नाहीत.

गेल्याच आठवड्यात नोकियाने आपला नवीन फिचरफोन Nokia 6310 जागतिक बाजारात सादर केला आहे. हा फोन वीस वर्षानंतर पुन्हा नव्या रूपात सादर करण्यात आला आहे. आता पुन्हा एकदा कंपनीने आपला Feature Phone चा पोर्टफोलियो वाढवत Nokia 225 4G Payment Edition लाँच केला आहे. हा फोन याआधी सादर झालेल्या Nokia 225 4G चा अपग्रेडेड व्हर्जन आहे.  

Nokia 225 4G Payment Edition मधील वन-की पेमेंट अ‍ॅक्शन या फोनची खासियत आहे. त्यामुळे पेमेंट करताना किचकट स्टेप्स कराव्या लागत नाहीत. हा 4जी फीचर फोन चीनमध्ये 349 युआनमध्ये लाँच करण्यात आला आहे. जे सुमारे 4,000 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होतात. लाँच ऑफर अंतर्गत हा फोन 309 युआन म्हणजे सुमारे 3,600 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

स्पेसिफिकेशन्स 

Nokia 225 4G Payment Edition मध्ये कंपनीने पॉलीकार्बोनेटचा वापर बॉडी बनवण्यासाठी केला आहे. इतर फिचर फोनप्रमाणे यात देखील टी9 न्यूमरिक कीपॅड मिळतो. त्याचबरोबर 2.4 इंचाचा क्यूवीजीए एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या UNISOC प्रोसेसरवर चालतो. फोनमध्ये 32 जीबी मायक्रोएसडी कार्डचा वापर मेमरी एक्सपान्शनसाठी करता येईल.  

Nokia 225 4G Payment Edition हा एक ड्युअल 4जी वोएलटीई कनेक्टिविटी असलेला फोन आहे. त्यामुळे इंटरनेट ब्राउजिंगसह एचडी वोएलटीई व्हॉइस कॉलिंग देखील करता येईल. या फोनमध्ये 3 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फ्लॅशलाईटसह हा फोन क्विक डायलिंग, व्हॉइस रेकॉर्डर आणि एक्सटर्नल रेडिओ असे फिचर मिळतात. external radio जैसे फीचर्स आहे.  

टॅग्स :Nokiaनोकियाtechnologyतंत्रज्ञान