Nokia फिचर फोन्सच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम करत आहे. याआधी देखील कंपनीनं जुनी डिजाईन आणि नवीन तंत्रज्ञान असलेले फिचर फोन बाजारात उतरवले आहेत. आता असाच एक फोन FCC प्लॅटफॉर्मवर मॉडेल नंबर TA-1398 सह लिस्ट करण्यात आला आहे. हा Nokia N139DL फ्लिप फोन असल्याची माहिती नोकिया पॉवरयुजर वेबसाईटनं दिली आहे. हा डिवाइस बाजारात Nokia 2760 Flip 4G नावानं सादर केला जाईल.
Nokia 2760 Flip 4G चे स्पेसिफिकेशन्स
लिस्टिंगनुसार Nokia 2760 Flip 4G स्मार्टफोन KaiOS वर चालेल. तसेच यात 1450mAh ची बॅटरी देण्यात येईल, जी सिंगल चार्जवर 6.8 तासांपर्यंतचा टॉकटाइम आणि 13.7 तासांपर्यंतचा स्टँडबाय टाइम देईल. तसेच Nokia 2760 Flip 4G मध्ये 5 मेगापिक्सलचा रियर-फेसिंग कॅमेरा मिळेल. तसेच या आगामी फ्लिप फोनमध्ये 4G, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स मिळतील. त्याचबरोबर मल्टीमीडिया मेसेजिंग, हॅन्ड्सफ्री स्पिकर, कलर डिस्प्ले, एमपी3 प्लेयर आणि टी4/एम4 हियरिंग एड कम्पॅटिबल (एचएसी) रेटिंग असे फिचर मिळतील.
Nokia 2760 Flip 4G ची किंमत
रिपोर्ट्सनुसार, Nokia 2760 Flip 4G फिचर फोन खिशाला परवडणारा नसेल. हा फोन जागतिक बाजारात 80 डॉलर्समध्ये सादर केला जाईल. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत जवळपास 6,000 रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन कधी लाँच होईल याची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही.