एचएमडी ग्लोबल कंपनीने आपल्या नोकिया ६ या स्मार्टफोनची ४ जीबी रॅम असणारी नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
एचएमडी ग्लोबल कंपनीने फेब्रुवारी २०१७ मध्ये नोकिया ६ हे मॉडेल लाँच केले होते. तर भारतीय बाजारपेठेत हा स्मार्टफोन जून २०१७ मध्ये उपलब्ध करण्यात आला होता. आता हेच मॉडेल नोकिया ६ (२०१८) या नावाने लाँच करण्यात आले आहे. यातील सर्वात लक्षणीय बदल हा रॅम व स्टोअरेजमध्ये करण्यात आला आहे. आधीचे मॉडेल हे ३ जीबी रॅम व ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेजयुक्त होते. तर नवीन आवृत्तीत ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज असणार आहे. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. हा अपवाद वगळता यातील अन्य फिचर्स हे मूळ मॉडेलनुसारच असतील. अर्थात नोकिया ६ (२०१८) या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा (१९२० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असेल. यावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६३० प्रोसेसर आहे. यातील मुख्य कॅमेरा १६ ते सेल्फीसाठी ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. हे मॉडेल अँड्रॉईडच्या नोगट या प्रणालीवर चालणारे असून यात ३००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आलेली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.
नोकिया ६ (२०१८) हा स्मार्टफोन मॅट ब्लॅक या रंगाच्या पर्यायात ग्राहकांना २० फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात येणार असल्याचे एचएमडी ग्लोबल कंपनीने जाहीर केले आहे. याचे मूल्य १६,९९९ रूपये इतके असून यासोबत ग्राहकांना २ हजार रूपयांचा एक्सचेंज डिस्काऊंट देऊ करण्यात आला आहे.