शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
5
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
6
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
7
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
8
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
9
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
10
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
11
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
12
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
13
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
15
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
16
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
17
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
18
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
20
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात

20 वर्षानंतर नव्या ढंगात Nokia 6310 लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स 

By सिद्धेश जाधव | Published: July 27, 2021 7:32 PM

Nokia 6310 2021 launch: नोकिया 6310 युरोपियन मार्केटमध्ये अधिकृतपणे लाँच केला गेला आहे. हा फोन भारतात कधी येईल याची माहिती मात्र अजूनतरी मिळाली नाही.  

Nokia ने आज तीन फोन बाजारात सादर केले आहेत. यात एक रगेड फोन, एक लो  बजेट स्मार्टफोन आणि एका फिचर फोनचा समावेश आहे. यातील फिचर फोन हा 20 वर्षांपूर्वी लाँच झालेल्या जुन्या नोकिया फिचर फोनचा नवा अवतार आहे. HMD Global ने नोकियाचा लोकप्रिय क्लासिक Nokia 6310 फोन नवीन फीचर्स आणि डिजाइनसह बाजारात आणला आहे. सध्या हा नवीन नोकिया 6310 युरोपियन मार्केटमध्ये अधिकृतपणे लाँच केला गेला आहे. हा फोन भारतात कधी येईल याची माहिती मात्र अजूनतरी मिळाली नाही.  

Nokia 6310 चे स्पेसिफिकेशन्स  

Nokia 6310 मध्ये 2.8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन UNISOC 6531F प्रोसेसरवर चालतो. या फिचर फोनमध्ये 8MB रॅम आणि 16MB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. तसेच यात Series 30+ ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.  

फोटोग्राफीसाठी नोकिया 6310 मध्ये 0.3 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. या कॅमेऱ्यासह एलईडी फ्लॅश देखील आहे. कनेक्टिव्हिसाठी हँडसेट मध्ये ब्लूटूथ 5.0, वाय-फायआणि एफएम रेडियो असे फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनमधील 1150mAh ची बॅटरी 7 तासांपेक्षा जास्त टॉकटाइम देते आणि अनेक आठवड्यांचा स्टॅन्डबाय टाइम देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.  

Nokia 6310 ची किंमत 

नवीन नोकिया 6310 सध्या युरोपमध्ये 59.90 युरो (अंदाजे 5,300 रुपये) मध्ये विकत घेता येईल. कंपनीने हा फोन तीन रंगात सादर केला आहे.  

टॅग्स :Nokiaनोकियाtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल